एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बंद लिफाफ्याद्वारे 1 कोटी 80 लाखांची बोली लावून 'त्याने' दाऊद इब्राहिमच्या बहिणीचा फ्लॅट विकत घेतला
आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या कुटुंबियांच्या मुंबईतील अजून एका मालमत्तेचा लिलाव करण्यात आला आहे. दाऊदची बहिण हसीना पारकर मुंबईतल्या नागपाडा भागात ज्या घरात राहत होती, त्या घराचा लिलाव करण्यात आला आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या कुटुंबियांच्या मुंबईतील अजून एका मालमत्तेचा लिलाव करण्यात आला आहे. दाऊदची बहिण हसीना पारकर मुंबईतल्या नागपाडा भागात ज्या घरात राहत होती, त्या घराचा लिलाव करण्यात आला असून घराला एक कोटी 80 लाख रुपये इतकी किंमत मिळाली आहे. या फ्लॅटसाठी अनेक लोकांनी बोली लावली होती. परंतु एका व्यक्तीने बंद लिफाफ्याद्वारे या फ्लॅटसाठी सर्वात मोठी बोली लावून हा फ्लॅट खरेदी केला आहे. फ्लॅट खरेदी करणाऱ्याचे नाव मात्र जाहीर करण्यात आलेले नाही.
नागपाडा भागात गॉर्डन अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये हसीना पारकर राहत होती. महसूल विभागाने 600 चौरस फूट इतके क्षेत्रफळ असलेल्या या घरासाठी 1 कोटी 69 लाख रुपये इतकी किंमत ठेवली होती. ई-लिलाव, बोली आणि बंद लिफाफ्याद्वारे ही लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावामध्ये हसीना पारकरच्या फ्लॅटला एक कोटी 80 लाख रुपये किंमत मिळाली आहे.
दाऊदचे मुंबईतले अस्तित्व संपत आहे. SAFEMA ने (smuggling and foreign exchange manipulators act) दाऊदची बहीण हसीना पारकरच्या फ्लॅटचा लिलाव केला आहे. safema कायद्याच्या सेक्शन 68-f नुसार जे आरोपी देश सोडून पळून जातात, त्यांची गैरमार्गाने जमवलेली जी मालमत्ता असते safema या मालमत्तेचा लिलाव करते.
मुंबईच्या नागपाडा परिसरात गॉर्डन हॉल अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर हसीना पारकरचा हा फ्लॅट आहे. 2014 पर्यंत हसीना पारकर या फ्लॅटमध्ये राहत होती. 2014 मध्ये हसीनाचा मृत्यू झाल्यानंतर दाऊदचा भाऊ इक्बाल कास्कर या फ्लॅटमध्ये राहत होता. खंडणीच्या आरोपाखाली ठाणे पोलिसांनी याच फ्लॅटमधून इक्बाल कास्करला अटक केली होती.
सुप्रीम कोर्टात कार्यरत असलेले वकील भूपेंद्र भारद्वाज यांना हसीनाचा फ्लॅट विकत घायचा होता. त्यांनी या फ्लॅटसाठी मोठी बोली लावली होती. परंतु एका व्यक्तीने बंद लिफाफ्यामध्ये 1 कोटी 80 लाख रुपयांची बोली लावून हा फ्लॅट खरेदी करण्यात यश मिळवले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
आयपीएल
राजकारण
निवडणूक
Advertisement