एक्स्प्लोर
Advertisement
पाच वर्षांच्या चिमुकल्याचा गटारात पडून मृत्यू
संततधार पडणाऱ्या पावसाने पाच वर्षाच्या चिमुकल्याचा बळी घेतला आहे. माथेरानमधल्या जामा मशीदीसमोरील गटारात पडून युवराज धीरज वालेंद्र या पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
रायगड : माथेरानमध्ये संततधार पडणाऱ्या पावसाने पाच वर्षाच्या चिमुकल्याचा बळी घेतला आहे. माथेरानमधल्या जामा मशीदीसमोरील गटारात पडून युवराज धीरज वालेंद्र या पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
माथेरानमध्ये राहणारा युवराज वालेंद्र हा मुलगा आणि त्याची मोठी बहीण क्लासवरून घरी परतत असताना ही घटना घडली आहे. खेळता-खेळता युवराज जामा मशीदीमोरील गटारात पडला आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला.
दरम्यान युवराज गटारात पडल्याचे पाहताच स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र गटारात हा चिमुकला अडकून राहिल्याने त्याचा श्वास कोंडला गेला. स्थानिकांनी या चिमुकल्याला गटारातून बाहेर काढेपर्यंत त्याच्या मृत्यू झाला होता.
गटारातून बाहेर काढल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रुग्णालयात मुलाला मृत घोषित करण्यात आले. या मुलाचे वडील हातरिक्षा ओढण्याचे काम करतात. त्याची आई हॉटेलमध्ये काम करत आहे. युवराजच्या मृत्यूमुळे माथेरानमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
Advertisement