एक्स्प्लोर
लाईव्ह कार्यक्रमात गिरीश महाजनांचे पुशअप्स, सीएम,पंकजांना चॅलेंज
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा फिटनेस फंडा काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला.
मुंबई: केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सोशल मीडियावरुन ‘फिट इंडिया’ मोहिम सुरु केली आहे. त्यासाठी स्वत: व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर व्यायाम करत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करा, असं आवाहन करत, राज्यवर्धनसिंह राठोड यांनी विविध सेलिब्रिटींना चॅलेंज दिलं. ही मोहिम चांगलीच चर्चेत आहे.
आधी सायना नेहवाल, मग हृतिक रोशन, विराट कोहली या मंडळींनी आपला फिटनेस दाखवत थेट पंतप्रधानांना चॅलेंज दिलं. आणि पंतप्रधानांनीही हे आव्हान स्वीकारलं.
आता थेट पंतप्रधानंच चॅलेंज स्वीकारत आहेत म्हटल्यावर महाराष्ट्रातील मंत्री किती फिट आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता वाढणं स्वाभाविक आहे.
म्हणूनच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा फिटनेस फंडा काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला.
लाईव्ह कार्यक्रमात पुशअप्स
यावेळी गिरीश महाजन यांनी लाईव्ह कार्यक्रमात सूर्यनमस्कार-पुशअप्स मारुन दाखवले. प्रत्येकाने दररोज व्यायाम करायलाच हवा, असा सल्लाही महाजन यांनी दिला.
यावेळी गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना फिटनेस चॅलेंज दिलं.
गिरीश महाजन यांनी आपण व्यायासाठी सातत्याने पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सल्ले देत असल्याचं सांगितलं.
लहानपणापासून व्यायाम
“मी लहानपणापासून मैदानी खेळ खेळतो. रात्री कितीही उशिरा झोपलो, तरी सकाळी 7 पर्यंत उठतोच. त्यानंतर तासभर व्यायाम करतो. कधीही व्यायाम चुकत नाही. अधिक काम करण्यासाठी ऊर्जा हवी असेल, तर नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले.
डाएट प्लॅन
“मला कोणतंही व्यसन नाही. मी मांसाहार करत नाही. मी कधीही तळलेले पदार्थ खात नाही. कधीही हॉटेलमध्ये जेवत नाही. कोणत्याही लग्नसमारंभात वगैरे जेवत नाही. खाण्यापिण्याची पथ्यं पाळायला हवी. व्यायाम आणि खाणं महत्त्वाचं आहे”, असंही महाजन यांनी सांगितलं.
मी फार काही डाएट करत नाही. सकाळी व्यायाम केल्यानंतर मी मटकी वगैरे खातो. वडे, भजी, पकोडे, समोसा वगैरेला मी कधीही स्पर्श केला नाही. अवास्थव काही खात नाही. केव्हाही खा, कितीही खा असं कधी करत नाही, असं महाजन म्हणाले.
अवास्थव खाऊ नका, काहीही खाऊ नका, वेळेवर खा, असा सल्ला त्यांनी दिला.
पंकजा मुंडेंना सल्ला
“मंत्रिमंडळात आमची कन्या पंकजा मुंडे आहे. तिला मी सतत व्यायम करण्यासाठी बजावत असतो. तिने आता बरंच वजन कमी केलेलं आहे”, असं महाजन म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार यांनाही मी सतत व्यायामासाठी सांगत असतोच. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पण व्यायाम करण्याचा सल्ला देतो.
मी सर्वांनाच व्यायाम करण्यास सांगतो, मग ते मुख्यमंत्री असो, चंद्रकांतादादा असो की एकनाथ खडसे, सर्वांना व्यायामासाठी सांगतो, असं गिरीश महाजन म्हणाले.
केवळ राजकारणीच नव्हे तर प्रत्येकाने व्यायाम करायला हवा, असं महाजन यांनी सांगितलं.
फिटनेस चॅलेंज कोणाला देणार?
सुधीरभाऊ, चंद्रकांतदादा, पंकजा मुंडे, मुख्यमंत्री आणि एकनाथभाऊ खडसे यांना व्यायामाचं चॅलेंज देतो. तुम्ही दररोज व्यायाम करा, माझ्यासारखा व्यायाम करुन दाखवा, असं आव्हान गिरीश महाजन यांनी सहकारी मंत्र्यांना दिलं.
VIDEO:
YOUTUBE VIDEO
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement