एक्स्प्लोर
देवनार कचरा डेपोला आग, परिसरात धुराचं साम्राज्य
मुंबई: मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडला आज रात्री पुन्हा एकदा आग लागली असून गेल्या तासाभरापासून ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे देवनार परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचं साम्राज्य पसरलेलं आहे. दरम्यान, या आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली आहे. मात्र महापालिकेच्या फायर इंजिनच्या साह्य्याने ही आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
मात्र, आग नेमकी किती मोठी आहे याबाबत अद्याप तरी माहिती समजू शकलेली नाही. देवनार डम्पिंगमध्ये याआधीही वारंवार आग लागण्याचा घटना घडल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यातही मोठी आग लागल्याची घटना घडली होती. वारंवार अशा घटना घडत असल्यानं येथील नागरिकांना धुराचं मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement