Fire Bike : आग विझवण्यासाठी मुंबईत फायर रोबोटनंतर आता फायर बाईक
Mumbai Fire Bike :अरुंद गल्ल्या, दाटीवाटीच्या वस्तीत आग विझवण्यासाठी अनेकदा अडचणी येतात. यासाठी आता मुंबई महापालिका फायर बाईक्सची खरेदी करणार आहे.
![Fire Bike : आग विझवण्यासाठी मुंबईत फायर रोबोटनंतर आता फायर बाईक Fire Bike: After the fire robot in Mumbai to put out the fire, now fire bike Fire Bike : आग विझवण्यासाठी मुंबईत फायर रोबोटनंतर आता फायर बाईक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/28/9dbf3670805df7c0dcfd168ae034db32_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Fire Bike : मुंबईत सतत आग लागण्याच्या घटना घडत असतात. अरुंद गल्ल्या, दाटीवाटीच्या वस्तीत आग विझवण्यासाठी अनेकदा अडचणी येतात. यासाठी आता मुंबई महापालिका फायर बाईक्सची खरेदी करणार आहे. मुंबईत फायर रोबोटनंतर आता फायर बाईक येणार आहे. आग विझवण्यासाठी 3 कोटी 15 लाखांच्या फायर बाईक्सचा नवा प्रस्ताव महापालिकेनं ठेवला आहे. मात्र, आधीच फायर रोबोट फेल गेल्यानं ७ कोटी पाण्यात गेलेत त्यानंतर आता या फायर बाईक कशाला असा सवाल विरोधकांनी केला आहे.
विशेष म्हणजे, एका फायर बाईकची किंमत 1 लाख 28 हजार आहे तर त्याच्यावरील फायर सिस्टीमसाठी, पाण्याच्या टाकीचा खर्च 10 लाख 22 हजार आहे. आधीच रोबोट फेल गेल्यानं आता गल्लोगल्ली जाऊन आग विझवणाऱ्या फायर बाईक खरोखर उपयुक्त ठरणार का हा सवाल विरोधकांनी केला आहे. त्यामुळे, आधी या फायर बाईकचे प्रात्याक्षिक करुन दाखवावे अशीही मागणी करण्यात आली आहे.
एक कोटींचा फायर रोबो पूर्णत: नापास, मुंबई मनपा प्रशासनाची स्थायी समितीत कबुली
फायर रोबोटचं काय झालं?
एक कोटी खर्चून घेतलेला फायर रोबो पूर्णत: नापास ठरला होता. फायर रोबो फायर ब्रिगेडचा पाण्याचा पाईपही ओलांडू शकला नव्हता, अशी कबुली मनपा प्रशासनाने दिली होती. कोट्यावधींचा खर्च करुन जे रोबो अग्निशमन दलाच्या ताफ्यात आणले ते फेल ठरले. एमटीएनएल इमारतीच्या आग दुर्घटनेवेळी रोबोला पुढे जाण्यासाठी कर्मचाऱ्यांनाच धक्का मारावा लागला होता. इतकंच नाही तर हा रोबो सपाट जमिनीवरच चालू शकतो. तो इमारतीच्या शिड्यांवर चढू शकला नव्हता. या रोबोला पाण्याच्या पाईपचा अडथळाही पार करता आला नव्हता.
ज्या ठिकाणी जवान पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी हा रोबो आग विझवेल म्हणून रोबोला ताफ्यात स्थान देण्यात आलं. पण, हा रोबो पूर्णत: कुचकामी असल्याचं प्रशासनानं स्थायी समितीत दिलेल्या कबुलीवरुन स्पष्ट झालं होतं. याबाबत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची आणि रोबो खरेदीच्या कंत्राटाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नगरसेवकांनी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)