एक्स्प्लोर
Advertisement
पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द, आजवरच्या सेमिस्टरच्या मूल्यांकनावरुन पदवीचा निकाल : मुख्यमंत्री
राज्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. आजवरच्या सेमिस्टरच्या मूल्यांकनावरुन पदवीचा निकाल लावणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
मुंबई : राज्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. आजवरच्या सेमिस्टरच्या मूल्यांकनावरुन पदवीचा निकाल लावणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. लॉकडाऊन हा शब्द कचरा पेटीत टाकायला मी आलो आहे. मात्र, हा लॉकडाऊन एकदम उठवण्यात येणार नसून हळूहळू उठवण्यात येणार आहे. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, असे काही लोक म्हणतात, त्यांनी आकडेवारी पाहावी असे, आवाहनही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं. यावेळी त्यांनी राज्यातील आकडेवारी सर्वांसमोर सादर केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे
- चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा शेवट आहे. मात्र, आता हा लॉकडाऊन हळूहळू काढण्यात येणार आहे.
- यंदा पावसाळा समाधानकार आहे.
- पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याचा धोका आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज आहे. मात्र, मच्छीमार बांधवांना आवाहन आहे, की आत्ता समुद्रात जाऊ नये.
- कोरोना सोबत जगायला शिका, हे सर्वजण सल्ले देत आहे. मात्र, आता यावर विचार करायला हवा.
- बाहरे जाताना मास्क लावणे अनिवार्य आहे. आपणचं आपली काळजी घ्यायला हवा.
- अनेकांना लॉकडाऊन उघडण्याची घाई झाली आहे. मात्र, आपल्याकडे तसे करणार नाही. लॉकडाऊन हा टप्प्याटप्प्यानेच उघडण्यात येणार आहे.
- महाराष्ट्रात 3 जूनपासून काही गोष्टींना परवानगी देण्यात येईल.
- 5 जूनपासून समविषम पद्धतीने दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येणार.
- 8 जूनपासून सरकारी कार्यलये हळूहळू सुरू करणार.
- 55 वर्ष वयाच्या पुढील नागरिकांची काळजी घ्या.
- जे घरातून बाहेर पडत आहे, त्यांनी घरात येताना काळजी घ्यावी.
- कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळल्यानंतर तत्काळ रुग्णालयात भरती व्हा.
- आपल्या राज्यात कोरोनामुक्त होण्याची संख्या अधिक.
- आतापर्यंत 28 हजारांच्या आसपास रुग्ण ठणठणीत होऊन घरी पोहचले.
- 34 हजारांपैकी 24 हजार रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाही.
- महाराष्ट्रात परिस्थिती हातात बाहेर गेली आहे, असं ज्यांना वाटतं त्यांनी ही आकडेवारी पहावी.
- महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम आपली लोकं करतात याचं दुःख वाटतं.
- पुढच्या रविवारपासून वृत्तपत्र घरपोच वाटण्यास संमती. मात्र, परवानगी देताना नियमांचे पालन करावे.
- सार्वजनिक ठिकाणी मर्यादित वेळेत फिरता येणार.
- राज्यात सध्या 77 कोरोना चाचणी प्रयोगशाला, येत्या काळात ही संख्या 100 वर नेणार.
- पावसाळ्यात चाचण्या वाढवण्यात येणार.
- कोरोना चाचणीची किंमत केंद्राशी बोलून कमी करणार.
- राज्यात खाटांची संख्या कमी पडत असली तरी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्यात येत आहे.
- रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे आभार, मागच्या वेळेस आम्ही बोलल्याने त्यांना राग आला आहे. मात्र, त्यानंतर त्यांनी रेल्वे उपलब्ध करुन दिल्याने अनेक मजुर त्यांच्या घरी पोहचले.
- अंतिम परिक्षा असणाऱ्या विद्यार्ख्यांनी
- राज्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार नाहीत
- आजवरच्या सेमिस्टरच्या मूल्यांकनावरुन पदवीचा निकाल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement