एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिव्यात शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेनचा सर्व्हे उधळला! भूसंपदनात भ्रष्टाचार केल्याचा आरोप
बुलेट ट्रेनच्या भूसंपदनात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत दिवे परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. आमचे पैसे आम्हाला मिळाले नाहीत, तर काम होऊ देणार नाही, अशी भूमिका आता शेतकऱ्यांनी केली आहे.
मुंबई : बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जागेची मोजणी करायला आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी पिटाळून लावल्याचा प्रकार ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात घडला आहे. बुलेट ट्रेनसाठीच्या भूसंपादन प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय. दिव्याच्या म्हातार्डी परिसरात आज(12 डिसेंबर)एमएमआरडीए आणि प्रकल्प अधिकारी आले होते. यावेळी त्यांना शेतकऱ्यांनी मोठा विरोध करत जागेची मोजणी करु दिली नाही.
बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांशी प्रकल्पांपैकी एक आहे. याला सुरुवातीपासूनच काँग्रेससह अनेक विरोधीपक्षांनी विरोध दर्शवला आहे. तर, स्थानिक शेतकऱ्यांचाही याला कडाडून विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर दिवा परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. या परिसरातल्या जमिनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या असल्या, तरी त्या सावकारांकडे गहाण आहेत. जागेचा मोबदला देताना तो शेतकऱ्याला देणं गरजेचं असताना सावकाराला परस्पर हे पैसे देण्यात आले. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत अधिकारी आणि सावकार यांच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. तसंच जोवर आमचे पैसे आम्हाला मिळणार नाहीत, तोपर्यंत या प्रकल्पाचं काम होऊ देणार नाही, असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.
ठाकरे सरकार बुलेट ट्रेनला स्थगिती देणार का?
महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर फडणवीस सरकारच्या अनेक कामांना स्थगिती देण्यात आली. त्यामुळे आरे मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता बुलेट ट्रेनला स्थगिती देणार का?, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कारण महाराष्ट्रातील सर्व विकास कामांची माहिती मागवल्याचं स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे बुलेट ट्रेनला डहाणू आणि पालघरमधील लोकांचा विरोध आहे. शिवसेनेने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केल्यानुसार, शिवसेना कोणत्याच विकास कामांमध्ये अडथळा बनणार नाही. परंतु, जर एखाद्या प्रकल्पासाठी जनतेचा विरोध असेल, तसेच एखादं विकास काम जनहिताच्या विरोधात असेल तर मात्र शिवसेना त्यावर पुर्नविचार करुन आपला निर्णय घेणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले होते.
बुलेट ट्रेन हा पांढरा हत्ती : छगन भुजबळ
राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ म्हणाले की, 'नवीन सरकार आल्यानंतर आता राज्यात सुरु असलेल्या प्रकल्पांचा आढावा या बैठकांमध्ये घेण्यात येत आहे. आतापर्यंत सुरू असलेल्या प्रकल्पांची प्रगती कुठपर्यंत आली आहे, त्यात काही अडचणी येत आहे का, यासर्व गोष्टी जाणून घेत आहोत. तसेच येऊ घातलेला बुलेट ट्रेन हा पांढरा हत्ती आहे, असं माझं मत आहे.'
हेही वाचा -
प्रगतीपथावरील प्रकल्पांच्या भवितव्यासाठी मंत्रालयात बैठका; मेट्रोच्या अश्विनी भिडे, समृद्धी महामार्गाचे राधेश्याम मोपलवार उपस्थित
राज्यातील कुठल्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही : उद्धव ठाकरे
Mumbai-Pune Hyperloop | बुलेट ट्रेन प्रकल्पानंतर हायपरलूप प्रकल्प सरकारच्या रडारवर? | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement