मुंबईतील प्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’चं ड्रग्ज प्रकरणात नाव, NCBकडून समन्स
हायप्रोफाईल बिजनेसमॅनपासून बॉलीवूडच्या सेलिब्रेटीपर्यंत मोठा ग्राहकवर्ग असणाऱ्या मुच्छड पानवालाची एनसीबी ड्रग्स प्रकरणात चौकशी करणार आहे.
मुंबई : गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या तपासामध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींची चौकशी केली जात होती. मात्र या सगळ्या तपास आता पडद्यामागच्या सेलिब्रिटींना गाठायला सुद्धा यांची विनोद सुरुवात केले. हा पडद्यामागचा सेलिब्रेटी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून मुंबईतील प्रसिद्ध पानवाला अशी ओळख असणारा मूच्छड पानवाला आहे. त्याचे पान फक्त मुंबईतच नाही तर जगातल्या अनेक ठिकाणी मागवले जातात. हायप्रोफाईल बिजनेसमॅनपासून बॉलीवूडच्या सेलिब्रेटीपर्यंत मोठा ग्राहकवर्ग असणाऱ्या मुच्छड पानवालाची एनसीबी ड्रग्स प्रकरणात चौकशी करणार आहे.
दोन दिवसांपूर्वीच मुंबईतल्या वांद्रे परिसरात मोठी कारवाई केली होती. या कारवाईत तब्बल दोनशे किलो गांजा आणि त्यांच्या मिश्रित पदार्थ हस्तगत केला. या प्रकरणात बॉलिवूडमधील एका बड्या सेलिब्रिटीची मॅनेजर राहिला. फर्निचरवाला आणि तिची बहीण सैष्ठा फर्निचरवाला यांना अटक करण्यात आली. त्याच बरोबर हे कार्टल चालवणाऱ्या ब्रिटिश नागरिक करण सजनानी याला सुद्धा एनसीबीने बेड्या ठोकल्या. या आरोपींच्या चौकशीत आता मुंबईतल्या केम्स कॉर्नर परिसरात दुकानात असलेल्या प्रसिद्ध पानवाला मूच्छड पानवाला याचं नाव समोर आलं आहे.
कोण आहे मूच्छड पानवाला?
अलाहाबादमधल्या हंडीया जिल्ह्यात राहणारा मुच्छड पानवाला 1977 साली मुंबईत आला आणि वडिलोपार्जित पान विकण्याचा व्यवसाय सुरू ठेवला. मुंबईतल्या हायप्रोफाईल परिसर समजल्या जाणाऱ्या नेपियनसी रोड परिसरात करोडो रुपयांच्या घरात मुच्छड पानवाला वास्तव्यास आहे. बड्या व्यवसायिकसोबत अनेक सेलिब्रेटी आणि क्रिकेटरसुद्धा मुच्छड पानवालाचे ग्राहक आहेत.
सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणी एनसीबीची एन्ट्री झाली. बड्या कलाकारांची ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून चौकशी ही करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी वांद्रे येथून ब्रिटिश नागरिक करन सजनानी आणि बॉलीवूड अभिनेत्रीची पूर्व मॅनेजर राहिला. फर्निचरवाला यांना एनसीबीने 200 kg गांजासह अटक केली. करण सजनानीने त्याच्या जबाबात मुंबईचा प्रसिद्ध मुच्छड पानवालाचं नाव घेतलं की तो सुद्धा गांजा घेतो म्हणून. आता मुच्छड पानवाला हा गांजा कोणासाठी घेत होता, का घेत होता? या सर्व प्रश्नांची उत्तरं एनसीबीला मुच्छड पानवाला कडून अपेक्षित आहेत.
मुच्छड पानवाला उर्फ जयशंकर तिवारी हा महागड्या मर्सिडीज कारमधून फिरतो. अनेक बडी नाव त्याच्या ग्राहक यादीत असल्याने त्याचा पानविक्री जगतात मोठा दबदबा आहे. फक्त मुंबईच नाही तर परदेशातूनसुद्धा त्याच्या पानसाठी ऑर्डर येतात. जयशंकर तिवारी यांनी पानविक्रीसाठी स्वतःची वेबसाईटदेखील सुरु केली आहे. मात्र एनसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात तिवारी उर्फ मुच्छड पानवाला अडकण्याची शक्यता आहे. इंटरनॅशनल ड्रग्ज कार्टलमध्ये नाव असलेला आरोपी करण सजनानी यांच्याकडून तिवारी याला गांजा पुरवला जात होता. ज्यामध्ये राहिला फर्निचरवालासुद्धा मदत करत होती असं तपासात स्पष्ट झाल्याच एनसीबीचे म्हणणे आहे. त्यामुळे मुच्छड पानवाला याचा या ड्रग्ज प्रकरणाशी कसा सबंध आहे हे पाहावे लागणार आहे.