Washing Machine Blast : वसईमध्ये राहत्या घरातच वॉशिंग मशीनला आग, बाथरूम जळून खाक
आपणा सर्वांना सावध करणारी बातमी.. आपल्या घरातील इलेक्ट्रीक उपकरणे जुनी झाली असतील, घरातील वायरी जुन्या झाल्या असतील तर ती चेक करुन घ्या..
Washing Machine Blast : आपणा सर्वांना सावध करणारी बातमी.. आपल्या घरातील इलेक्ट्रीक उपकरणे जुनी झाली असतील, घरातील वायरी जुन्या झाल्या असतील तर ती चेक करुन घ्या.. कारण वसईमध्ये एका राहत्या घरातच वॉशिंग मशीनमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडलीय. काय घडले नेमके?
राहत्या घरातच वॉशिंग मशीनला लागली आग.
ही घटना सोमवारी संध्याकाळी चार वाजता च्या सुमारास घडली आहे. वसई पश्चिमेच्या ओम नगर परिसरात धुरी कॅाप्लेक्स मधील स्वागत -२ या सोसायटीमध्ये राहणा-या अजीत जानी यांच्या घरात हा प्रकार घडलेला आहे. दुपारी अचानक शॉर्टसर्किट होऊन वॉशिंग मशीन मधील समोरच्या झाकणाला तसेच वॉशिंग मशीन मधील सप्लाय करणा-या सर्किटला आग लागली. त्यावेळी घरी अजीत जानी यांची मुलगी एश्वर्या घरी एकटीच होती. वसई विरार शहर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि माणिकपूर पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचल्या मुळे आग नियंत्रणात आली. विशेष म्हणजे याच घरात एक पाळीव कुत्रा देखील होता. वेळीच ऐश्वर्याने पाळीव कुत्र्याला खाली आणले त्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. वॉशिंग मशीनला लागलेल्या आगीमुळे घरातील बाथरूम पूर्णपणे जळून खाक झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होवू शकलं नाही.
जीवितहानी नाही
वसईमध्ये एका राहत्या घरातच वॉशिंग मशीनमध्ये अचानक आग लागली. आणि ती मशीन जळून खाक झाली आहे. या आगीमुळे बाथरुमसह घरातील काही भागाच नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील इलेक्ट्रीक उपकरणाची काळजी घेणं आता आवश्यक झालं आहे.
काय काळजी घ्यावी?
घरात वोल्टेजचा इश्यू असेल तर इलेक्ट्रीक उपकरणांना स्टॅबलाईजर बसवावा
घरात आर्थिंग नसेल तरी ही शॉर्टसर्किट होवू शकतो. त्यामुळे घरातील आर्थिंग चेक करावी.
वॉशिंग मशीन ही बाथरुम मध्ये ठेवू नये, कारण मशिनला पाणी लागून रस्ट पकडू शकत आणि मोटर आणि पॅनलवर त्याचा इफेक्ट पडून, शॉटसर्किट होवू शकतो.
वॉशिग मशीनच्या वरच्या भागीतील डिजिटल पॅनलवर ही पाणी टाकू नये. त्याने ही शॉर्टसर्किट होवू शकतो.
वॉशिंग मशीनला सप्लाय देणा-या पावर ऑन आणि पावर ऑफ सर्किट वर ही लक्ष द्यावं कारण केवळ वॉशिंग मशीनच बटन ऑफ ठेवलं आणि मुख्य पॉवर ऑफ नाही केली तरीही शॉर्टसर्किट होवू शकतं.
घरातील इलेक्ट्रीक वायरिंग चांगल्या दर्जाची हवी आहे. आणि ती वेळोवेळी चेक करावी.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Shivsena : शिवसेनेच्या निशाण्यावर असणारे भाजपचे 'ते' साडेतीन नेते कोण? 'या' नावांची चर्चा
- Shivsena Press Conference : शिवसेनेची आज पत्रकार परिषद; पोलीस बंदोबस्तात वाढ, मुंबईकरांना केले 'हे' आवाहन
- ED raids in Mumbai : मुंबईत ईडीचे छापासत्र, शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले...
- शिवसेना कोणता 'बॉम्ब' फोडणार? आज पत्रकार परिषद; भाजप नेत्यांना कोठडीचा रस्ता दाखवण्याचा राऊतांचा इशारा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha