(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वर्क फ्रॉम होममुळे वीजबिल वाढलं : ऊर्जामंत्री नितीन राऊत
थकीत वीजबिल तीन महिन्यांच्या टप्प्यात भरण्याची मुभा देण्यात येत आहे. तसेच संपूर्ण वीजबिल भरल्यास 2 टक्के सूट मिळणार असल्याची माहितीही नितीन राऊत यांनी दिली.
मुंबई : लॉकडाऊनदरम्यान वाढलेलं वीज बिल ग्राहकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. यासंदर्भात उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेत लोकांच्या मनतील प्रश्नांची उत्तरं दिली. लॉकडाऊनच्या काळात एप्रिल आणि मे महिन्यात वर्क फ्रॉम होममुळे वीज वापरात वाढ झाली आहे. त्यामुळे जून महिन्याच्या वीज बिलात वाढ दिसून येत आहे, असं नितीन राऊत यांनी सांगितलं. थकीत वीजबिल तीन महिन्यांच्या टप्प्यात भरण्याची मुभा ग्राहकांना देण्यात येत आहे. तसेच संपूर्ण वीजबिल भरल्यास 2 टक्के सूट मिळणार असल्याची माहितीही नितीन राऊत यांनी दिली.
विजेच्या बिलासंदर्भात लोकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. वीज नियामक आयोगाने सूचना दिल्या आहेत. MERC ने दारोदारी जाऊन रीडिंग घेतलेलं नाही. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीचे सरासरीपेक्षा कमी रीडिंग घेऊन एप्रिल, मे महिन्यात बिल आकारण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात एप्रिल व मे महिन्यात वर्क फ्रॉम होममुळे वीज वापरात वाढ झाली आहे. त्यामुळे जून महिन्याच्या वीज दरात वाढ दिसून येत आहे, असं नितीन राऊत यांनी म्हटलं. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता क्षेत्रीय कार्यालयात मदत केंद्रात नेमलेले आहेत. त्यानुसार ग्राहकांना समजवण्याचं काम सुरू आहे.
वाढलेलं वीज बिल पाहून तापसी पन्नूला बसला 'शॉक', सोशल मीडियावर शेअर केलं वीज बिल
ग्राहकांसाठी सवलती
- थकीत वीजबिल तीन महिन्यांच्या टप्प्यात भरण्याची मुभा देण्यात येत आहे.
- एक तृतीयांश बिल भरले तरी वीज कापण्यात येणार नाही.
- संपूर्ण वीज बिल एकत्र भरल्यास 2 टक्के सूट देण्यात येईल.
- जे लोकं घर सोडून बाहेर होते, त्यांची माहिती मिळाल्यास त्यांच्या मीटरमध्ये करेक्शन करून रिडींग घेतली जाईल.
- वीज मीटर बिघाड झाला असल्यास दुरुस्ती करून देण्यात येईल.
- महावितरण कार्यालयात जाण्याची कोणतीही गरज नाही.
- ज्या ग्राहकांनी या अगोदर संपूर्ण रक्कमेच्या वीजबिल भरले असल्यास त्यांना देखील ती सूट देण्यात येईल.