Mumbai: मुलीची छेड काढली म्हणून नोकराची हत्या, मालकासह त्याच्या पत्नीला अटक
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजलीय. याप्रकरणी मानखुर्द पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Mumbai: मुलीची छेड काढणाऱ्या नोकराची हत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडलीय. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी मालकासह त्याच्या पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजलीय. याप्रकरणी मानखुर्द पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल खलील शेख (वय, 69) वर्षीय मृत नोकराचं नाव आहे. अब्दुल हे मोहम्मद सलीम जफर मोहम्मद अखतर आलम ऊर्फ सलीम आणि फरीदा यांच्या मुलुंड येथील घरी घरकाम करीत होते. दरम्यान, अब्दुल यांनी 1 जानेवारीला मालकाच्या मुलीला झोपेतून उठवताना तिच्या अंगाला हात लावून तिची छेड काढली, असं आरोपींनी पोलिसांनी माहिती दिली. त्यामुळं आरोपींनी अब्दुल यांना लाकडी दांडे, पट्टे यांनी मारहाण करीत होते. त्यानंतर त्यांनी काल अर्धमेल्या अवस्थेत त्यांना शिवाजी नगर येथील त्यांच्या जावयाकडे घेऊन गेले. मात्र रस्त्यातच अब्दुल यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर आरोपींनी रस्त्यावरच अब्दुल यांचा मृतदेह फेकून पळ काढला. या संदर्भात माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी अब्दुलचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. यावेळी त्यांना मारहाण होऊन अंतर्गत हाडे तुटून रक्तस्त्राव झाल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी अब्दुल यांचा फोटो व्हायरल करून मृतांच्या नातेवाईकांचा शोध लावला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना चेंबूर येथे पळून जात असताना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केलीय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-