एक्स्प्लोर
“तुमची उणीव भासतेय...”, मुंडेंच्या स्मरणार्थ खडसेंचे पोस्टर्स
मुंबई : राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ आदरांजली व्यक्त करणारे पोस्टर्स मुंबईभर लावले आहेत. “तुमची उणीव भासतेय..”, “असा नेता पुन्हा होणे नाही..”, “कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्त्व” अशी वाक्य असणारे हे पोस्टर्स मुंबईत लावले गेले आहेत.
पाहा आणखी फोटो : “तुमची उणीव भासतेय...”, मुंडेंच्या स्मरणार्थ खडसेंचे पोस्टर्स
विशेष म्हणजे या पोस्टर्सवर भारतीय जनता पक्षाचा उल्लेख करण्यात आला नसून, केवळ महसूलमंत्री खडसे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे-खाडे यांचा उल्लेख या पोस्टर्सवर आहे. त्यामुळे या पोस्टर्सवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ खडसेंवर सध्या अनेक आरोप होते आहेत. मात्र, यादरम्यान भाजपमधून कुणी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं असल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे खडसे पक्षांतर्गत नाराज असल्याचीही चर्चा आहे. याआधी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्यावेळी पक्षातील वरिष्ठांकडून पत्रकार परिषद घेऊन आरोप खोडून काढले गेले होते. मात्र, खडसेंवर एकामागोमाग एक अनेक आरोप होत असतानाही भाजपमधून कुणीच पुढे येताना दिसत नाही. त्यामुळे मुंबईतील लावण्यात आलेल्या या पोस्टर्सचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळात पडला आहे.पाहा आणखी फोटो : “तुमची उणीव भासतेय...”, मुंडेंच्या स्मरणार्थ खडसेंचे पोस्टर्स
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement