एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत डंपर चोरट्यांना दुसऱ्या चोरट्याचा गंडा
मुंबई : चोरट्यांनाच फसवल्याची घटना मुंबईत घडली आहे. ज्या चोरट्यांनी डंपर लुटला होता, त्यांचीच नंतर फसवणूक करण्यात आली. हा डंपर लुटणाऱ्यांची एका गुंडाकडून केवळ एक हजार रुपये देऊन बोळवण करण्यात आली. इतकंच नाही तर डंपर चोरणाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
6 एप्रिल रोजी ही घटना घडली. एक डंपर चालक वाळू घेऊन वाशीहून मुंबईला येत होता. पण ट्रॉम्बेजवळ आल्यावर एका स्विफ्ट कारने डंपरला ओव्हरटेक केलं. कारमधून चार जण उतरले. त्यांनी डंपरच्या चालकाला खाली ओढलं आणि डंपर घेऊन पसार झाले.
मुंबई क्राईम ब्रान्चला घटनास्थळावरच्या सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले. या फुटेजमध्ये डंपर आणि कार दिसत होती, पण कारचा नंबर दिसत नव्हता.
यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक खोत यांनी दुसऱ्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास केला. त्यामध्ये जावेद नावाचा मुख्य आरोपी त्यांच्या हाती लागला. त्याच्या चौकशीनंतर इतर आरोपीही जाळ्यात सापडले.
आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, "गुजरातमधील एका गुंडासोबत डंपरबाबत डील केली होती. आम्ही डंपर चोरुन तो गुंडाला विकणार होतो. गुंडाने हा डंपर सहा लाख रुपयांमध्ये खरेदी करण्याचं आश्वासन दिलं होतं. 7 एप्रिलला आम्ही त्याला डंपर देण्यास गेलो, त्यावेळी माझ्याकडे आता सहा लाख रुपये नाहीत, सध्या तुम्ही एक हजार रुपये टोकन म्हणून ठेवून घ्या, उरलेली रक्कम नंतर देतो, असं उत्तर गुंडाने दिलं. त्यानंतर आम्ही मुंबईत परतलो."
पण गुजरातमधील गुंड हा डंपर घेऊन पसार झाला, तर डंपर चोरणारे चारही जण जेलमध्ये गेले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement