![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron : ओमायक्रॉनचा आलेख वाढताच, मंत्रालयातील बायोमेट्रीक हजेरी पद्धत स्थगित
कोरोना रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने मंत्रालयातील तसेच राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कार्यालयीन उपस्थितीची नोंदणी बायोमेट्रीक प्रणालीवर करण्याचे काही काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.
![Omicron : ओमायक्रॉनचा आलेख वाढताच, मंत्रालयातील बायोमेट्रीक हजेरी पद्धत स्थगित Due to Increase in Omicron variants of covid maharashtra Ministry postpones biometric attendance system Omicron : ओमायक्रॉनचा आलेख वाढताच, मंत्रालयातील बायोमेट्रीक हजेरी पद्धत स्थगित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/30/6c186e9d36f1bc1e91858afc0774caa8_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोरोना विषाणूच्या 'ओमायक्रॉन'(Omicron) या नव्या व्हेरियंटमुळे रूग्ण वाढीचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. याच अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कार्यालयीन उपस्थिती बायोमेट्रीक प्रणाली संदर्भात महत्त्वाच्या सूचना मंत्रालयाने दिल्या असून तूर्तास ही पद्धत स्थगित करण्यात आली आहे.
मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थिती नोंदवण्यासाठी बसवण्यात आलेल्या बायोमेट्रिक मशिन्स पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे, उपस्थिती नोंदवताना होणारी गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी मंत्रालय तसंच नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर बायोमेट्रिक मशिन्स बसविण्याबाबत माहिती तंत्रज्ञान विभागाने 15 दिवसात कार्यवाही करावी. असे आदेश देण्यात आले आहेत. इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर बायोमेट्रिक मशिन्स माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत बसवण्यात येईपर्यंत मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांच्या कार्यालयीन उपस्थितीकरिता बायोमेट्रीक प्रणालीचा वापर पुढील आदेशापर्यत स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईत कोरोनाचा स्फोट
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज (बुधवारी) पुन्हा एकदा मुंबईत कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत गेल्या 24 तासांत 15 हजार 166 नव्या रुग्णाची भर पडली आहे. मागील 24 तासांत 714 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आज आढळलेल्या 15 हजार 166 रुग्णापैकी 1218 रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.
हे ही वाचा -
- भारत बायोटेकच्या Nasal Vaccine च्या तिसऱ्या टप्यातील चाचणीच्या मंजुरीसाठी CDSCO ची शिफारस, बुस्टर डोससाठी होणार वापर
- Omicron in Maharashtra : मंगळवारी 75 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद, मुंबईत एका दिवसात 40 नवे रुग्ण
- राज्यातील 170 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण, मुंबईतील डॉक्टर सर्वाधिक कोरोनाबाधित
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)