Dr. Gauri Garje Father Reaction : माझां लेकरु गेलं, डॉ. गौरी गर्जेच्या वडिलांनी हंबरडा फोडलाज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जे यांनी शनिवारी संध्याकाळी आत्महत्या केली होती. मुंबईच्या वरळी येथील राहत्या घरी गौरी पालवे गर्जे (Gauri Palve Garje) यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. मात्र, त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. आमच्या मुलीने आत्महत्या (Suicide news) केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असे गौरीच्या वडिलांनी म्हटले. त्यांच्या तक्रारीनंतर वरळी पोलिसांनी अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे आणि भाऊ अजय गर्जे या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत गर्जे (Anant Garje) हे पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असल्याने या आत्महत्याप्रकरणामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. वरळी पोलिसांनी काल संध्याकाळी गौरी पालवे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन केईएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. परंतु, त्यानंतर गुन्हा दाखल झाला नव्हता. काल रात्रीपासून गौरी गर्जे यांचे नातेवाईक वरळी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. त्यानंतर रविवारी सकाळी अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या कार्यालयाकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. (Mumbai crime news)