एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डॉ. सुहास पेडणेकर मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरु
राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी डॉ.सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नेमणूक केली.
मुंबई : अखेर मुंबई विद्यापीठाला नवे कुलगुरु मिळाले आहेत. रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून निवड झाली आहे.
राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी डॉ.सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नेमणूक केली. राज्यपालांनी आज (27 एप्रिल) राजभवनात डॉ. सुहास पेडणेकर यांना नियुक्त पत्र सोपवलं.
डॉ. पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरुपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची 65 वर्षे पूर्ण करेपर्यंत करण्यात आली आहे. राजभवनाने यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे.
अशी झाली निवड!
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी 13 आणि 14 एप्रिल रोजी 32 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामधून डॉ.कस्तुरीरंगन समितीने अंतिम पाच जणांची निवड केली आहे. त्या पाच जणांच्या मुलाखती कुलपतींकडून पूर्ण झाल्या आहेत.
कुलगुरुपदासाठी डॉ. रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर, नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. प्रमोद येवले, अमरावती विद्यापीठाचे डॉ. विलास सपकाळ यांच्यात मुख्य चुरस होती. त्यामधून आज डॉ. सुहास पेडणेकर यांच्या नावाची घोषणा झाली.
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी मोठी चुरस
निकालांचा बोजवारा
डॉ. संजय देशमुखांच्या काळात मुंबई विद्यापाठीत अनेक निकालांचा बोजवारा उडाला होता. यानंतर देशमुखांना 24 ऑक्टोबर 2017 रोजी कुलगुरुपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. त्यामुळे गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून मुंबई विद्यापीठाला कुलगुरुच नव्हते.
कोण आहेत डॉ. सुहास पेडणेकर?
डॉ. सुहास पेडणेकर (प्राचार्य, रुईया महाविद्यालय, मुंबई)
शिक्षण : पीएचडी इन ग्रीन केमिस्ट्री ,स्टिव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, यूएसए
अनुभव : 28 वर्षापेक्षा प्राध्यापक, रिसर्चर, गाईड, प्राचार्य म्हणून काम. 2012 सालचा महाराष्ट्र सरकारच्या बेस्ट टीचर पुरस्काराने सन्मान, टाटा केमिकल लिमिटेड कडून 'बेस्ट केमिस्ट्री टीचर 'म्हणून सन्मान
उच्च शिक्षण समितीत वेगवेगळ्या स्तरावर प्रशासकीय कामाचा अनुभव.
इंडियन केमिकल सोसायटी, इंडियन सायन्स काँग्रेस आदी संस्थांचे सदस्यत्व
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
ठाणे
Advertisement