एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mahaparinirvana Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर; घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचं आवाहन

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अनुयायांनी एकत्र न येण्याच्या सूचना देण्यात आल्या असून चैत्यभूमीवरील कार्यक्रमांचं दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. येत्या 6 डिसेंबर रोजी मुंबईतल्या चैत्यभूमीवर कोणताही जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यास राज्य शासनानं मनाई केली आहे. सभा, संमेलनं घेण्यास किंवा मोर्चा काढण्यासही राज्य शासनानं परवानगी नाकारली आहे. ओमायक्रॉन विषाणूच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर यंदा महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घरूनच अभिवादन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

काय आहे राज्य सरकारची नियमावली? 

1. यावर्षी परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा दिनांक 06 डिसेंबर रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेवून साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता आयोजित करावयाचा आहे. 

2. कोविड 19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक क्रमांक " ब्रेक द चेन " अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. 

3 . महापरिनिर्वाण दिन हा  परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे . त्यामुळे ओमिक्रॉन या कोरोना विषाणुच्या प्रजातीमुळे कोविड संसर्गाचा वाढलेल्या धोक्याचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे . 

4. शासनातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी , दादर , मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी चैत्यभूमी , दादर , मुंबई येथे न येता घरी राहूनच परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. सदर कार्यक्रमासाठी जे व्यक्ती परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतील त्यांचे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पुर्ण झालेले असणे बंधनकारक राहील. 

5. कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग, संक्रमण वाढणार नाही. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी / शिवाजी पार्क मैदान परिसरात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ / पुस्तके यांचे स्टॉल लावण्यात येवू नयेत . तसेच सदर परिसरात कोणत्याही प्रकारच्या सभा , धरणे , निदर्शने , आंदोलने व मोर्चे काढू नयेत. 

6 . महापरिनिर्वाण दिनानिमित्त परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम हा राज्यातील सर्व जिल्हे तालुके यामध्येही आयोजित करण्यात येत असल्याने त्यासंदर्भात स्थानिक / जिल्हा प्रशासनाने कोविड 19 च्या स्थानिक परिस्थितीचा विचार करुन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात व त्यासंबंधीचे आदेश काढावेत. 

7. कोविड 19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग , मदत व पुनर्वसन विभाग , आरोग्य , पर्यावरण , वैद्यकिय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका , पोलीस , स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन सर्व नागरिकांनी करावे तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष महापरिनिर्वाण दिन अभिवादन सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासन व स्थानिक प्रशासन स्तरावरुन आणखी काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 AM : 29 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines  : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 06 AM : 29 NOV 2024Mahayuti Maharashtra New CM : दिल्लीत 2 तास बैठक, अमित शाहांशी चर्चा; महायुती काय ठरलं?Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Aishwarya Rai ला शाहरुखनं एक नाहीतर, तब्बल 5 चित्रपटांमधून हटवलं; Salman Khan होता कारण? VIDEO
Aishwarya Rai ला शाहरुखनं एक नाहीतर, तब्बल 5 चित्रपटांमधून हटवलं; Salman Khan होता कारण?
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
Embed widget