एक्स्प्लोर

Alexis Hospital | नागपुरातील एलेक्सिस रुग्णालयात गोंधळ घालत टोळक्याची डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी

नागपुरातील प्रसिद्ध एलेक्सिस रुग्णालयात पाच ते सहा जणाच्या टोळक्याने गोंधळ घालत डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्यासह इतर 5 जणांवर मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय.

नागपूर : महिलेचा इको चाचणीचा रिपोर्ट दिला नसल्याचं कारण सांगत नागपुरातील सुप्रसिद्ध एलेक्सिस रुग्णालयात पाच ते सहा जणांना गोंधळ घातला होता. यावेळी तिथे उपस्थित डॉक्टर्सला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी साहिल सय्यद नावाचा सामाजिक कार्यकर्ता आणि इतर 5 जणांवर मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सय्यद आणि त्याच्या सहकाऱ्यांवर आरोप आहे की 4 जुलै रोजी त्यांनी एलेक्सिस रुग्णालयात जाऊन डॉक्टर्सला दमदाटी केली आणि रुग्णालयात बुलडोझर आणून रुग्णालयाची भिंत पाडण्याची धमकी दिली. गोंधळ घालणाऱ्यांचा दावा होता की एलेक्सिस रुग्णालयाने एका महिलेचा इको चाचणीचा रिपोर्ट तिला दिलेला नाही. तर संबंधित महिलेची इको चाचणी काही कारणास्तव झालीच नसल्याने तिचे रिपोर्ट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे रुग्णालयाचे म्हणणे होते. याच मुद्द्यावरून त्यांच्यातील वाद वाढत जाऊन गोंधळ घालणाऱ्या टोळक्याने डॉक्टर्सला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा रुग्णालयाचा आरोप आहे.

नागपुरात दारूविक्रेत्याला महिलांनी धू-धू धुतले, पोलिसांचे अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष

महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद रुग्णालयाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करत या प्रकरणी सय्यद आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हे सर्व जण फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. विशेष बाब म्हणजे हा गोंधळ सुरू असताना महापालिकेचे अधिकारीही तिथे पोहोचले होते. त्यांनी ही रुग्णालयावर दबाव आणल्याचा आरोप होतय. मात्र, त्यासंदर्भात एलेक्सिस रुग्णालयाने कोणतीही तक्रार पोलीस किंवा महापालिका प्रशासनाकडे दिलेली नाही. तशी तक्रार आल्यास तिथे उपस्थित महापालिकेचे अधिकाऱ्यांचे या गोंधळाशी संबंध आहे का? याची चौकशी केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, ज्या अर्थी रुग्णालयात इतर अनेक रुग्ण असताना हे गोंधळ घालण्यात आले हे अत्यंत गंभीर असून पोलिसांनी रुग्णलयातील सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात रुग्णालय प्रशासनाला काही सूचना केला आहेत, अशी माहिती झोन 2 च्या डीसीपी विनिता शाहू यांनी दिली आहे. लवकरच आरोपीना अटक केले जाईल, अशी माहितीही डीसीपी शाहू यांनी दिली आहे.

Containment Zoneमध्ये सोडलं नाही म्हणून पुण्यातील दाम्पत्याने विष प्राशन केले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Local Train Accident Dombivli: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2026 | रविवार
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले

Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte: सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
Local Train Accident Dombivli: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Ahilyanagar Crime News: 'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
Bhendwal Bhavishyvani 2026: जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
Embed widget