एक्स्प्लोर

नागपुरात दारूविक्रेत्याला महिलांनी धू-धू धुतले, पोलिसांचे अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष

पोलीस अवैध दारूवाल्यांवर कारवाई करत नाहीत म्हणून महिलांना कायदा हातात घेत दारू विक्रेत्याला पकडावे लागले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदारसंघातील नागपुरातील नरखेड तालुक्यातील आग्रा गावात ही घटना घडली आहे.

नागपूर : पोलीस अवैध दारूवाल्यांवर कारवाई करत नाही म्हणून महिलांना कायदा हातात घेत दारू विक्रेत्याला पकडावे लागले आहे. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील आग्रा गावात ही घटना घडली आहे. आग्रा गावात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री विरोधात महिलांमध्ये रोष आहे. गावात राजरोसपणे अवैध दारू उपलब्ध होत असून तळीराम नवऱ्यांमुळे महिलावर्गाला अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच 29 जून रोजीला गावात महिलांनी एक बैठक घेत यापुढे गावात अवैध दारू विक्री होऊ दिली जाणार नाही असे पोलिसांना बजावले होते. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाईचं आश्वासन दिलं होता. मात्र, त्यानंतर ही गावात अवैध दारू विक्री काही थांबली नाही. उलट महिलांनी बैठक घेऊन ही पोलीस दारूवाल्यांविरोधात कारवाई करत नसल्याने अवैध दारू विक्रेत्यांचे मनोबल वाढले होते. पोलीस काहीच करत नाही हे लक्षात आल्यावर महिलांनी स्वतः गावाच्या वेशीवर निगराणी ठेवणे सुरू केले होते. काल संध्याकाळी ललित नावाचा दारू विक्रेता महिलांना दिसला. गावाच्या वेशीवर महिलांनी त्याला अडवले. त्याच्याकडील प्लास्टिकच्या डबक्याची पाहणी केली असता त्यात देशी दारू आढळली. त्यानंतर प्रचंड संतापलेल्या महिलांनी चक्क दुर्गेचा अवतार धारण करत या दारू विक्रेत्याला चांगलीच अद्दल घडविली. काही महिलांनी तर या दारू विक्रेत्याला चपलेने चांगलेच बदडले. घाबरलेला दारू विक्रेता महिलांची माफी मागू लागला. पुढे असे करणार नाही असे सांगून सोडून देण्याची विनवणी करू लागला. महिलांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र तरीही त्याच्या विरोधात पोलिसांनी अद्यापपर्यंत ठोस कारवाई केलेली नाही. ग्रामीण भागात अवैध दारूचा महिलांना प्रचंड त्रास असतो. म्हणूनच आग्रा गावासारखीच अवैध दारूच्या विक्रीवर लगाम लावण्याची मागणी अनेक गावात होत असते. मात्र, जेव्हा कायदाची अंमलबजावणी करणारे पोलीस त्यांचे काम नीट करत नाही. तेव्हा महिलांना अशाच पद्धतीने कायद्याची मर्यादा ओलांडून स्वतःच दारू विक्रेत्यांना अद्दल घडवावी लागते. आणि नागपूर जिल्ह्यातील आग्रा गावात नेमके तेच घडले आहे. विशेष म्हणजे ज्या आग्रा गावात ही घटना घडली ते आग्रा गाव गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदार संघातील गाव आहे. त्यामुळे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही असा गृहमंत्र्यांच्या इशारा त्यांच्याच मतदारसंघात पोलिसांनी गांभीर्याने घेतला नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMahesh Tapase NCP :  आम्हाला 160 पेक्षा जास्त जागा मिळतीलBJP Strike Rate : मागील पाच निवडणुकांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Sharad Pawar : एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Sharad Pawar:  मोठी बातमी: विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात; नारायण राणेंचा खळबळजनक दावा
विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात; नारायण राणेंचा खळबळजनक दावा
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
Embed widget