एक्स्प्लोर

मुंबईकरांनो वडाचे झाड अथवा त्याच्या फांद्या तोडू नका, होईल कारावासाची शिक्षा

Vat Purnima: अनधिकृतरित्या कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करणे हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी दंड आणि कारावासाची कायद्यात तरतूद आहे.

Vat Purnima: अनधिकृतरित्या कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करणे हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी दंड आणि कारावासाची कायद्यात तरतूद आहे. येत्या वटपौर्णिमा सणाच्या पार्श्वभूमीवर वडाच्या झाडाच्या फांद्या अथवा झाड तोडू नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. अनधिकृत वृक्षतोड केल्याचे आढळल्यास महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, 1975 (दिनांक 1 जानेवारी 2016 पर्यंत सुधारित) च्या कलम 21 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे पालिकेने सांगितले आहे.
 
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, 1975 (दिनांक 1 जानेवारी 2016 पर्यंत सुधारित) च्या कलम 21 मधील तरतुदीनुसार वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडण्यास किंवा तोडण्यास कारणीभूत होणे हा अपराध आहे. अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यास अपराध सिद्धीनंतर प्रत्येक अपराधाकरिता कमीतकमी रुपये 1 हजारपासून 5 हजारापर्यंत दंड तसेच एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. अनधिकृत वृक्षतोड हा कायदेशीर गुन्हा असून गुन्हेगारास कैद होऊ शकते. 

प्रत्येकवर्षी ‘वटपौर्णिमा’ सणाच्या वेळी वडाच्या झाडाच्या फांद्या बाजारात विक्रीसाठी दिसतात. ‘वटपौर्णिमा’ सणाचे औचित्य साधून विक्रेते सार्वजनिक रस्त्यांच्या आजूबाजूची व खासगी आवारातील वडाचे झाड/ फांद्या तोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात झाडांच्या संगोपनाची अतिशय आवश्यकता आहे. कारण, झाडांची संख्या कमी होऊन पर्यावरणालाही हानी पोहचते. 

दिनांक 14 जून 2022 रोजी साजरा होणाऱ्या ‘वटपौर्णिमा’ सणाकरिता कोणत्याही प्रकारची वृक्षतोड होऊ नये, याकरिता सतर्क राहण्याचे आदेश सर्व उप उद्यान अधीक्षक, सहायक उद्यान अधीक्षक यांना देण्यात आले आहेत. अनधिकृत वृक्षतोड करताना आढळल्यास महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, 1975 (दिनांक 1 जानेवारी 2016 पर्यंत सुधारित) च्या कलम 21 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.   

संबंधित बातमी: 

Vat Savitri Vrat : वटपौर्णिमेचा मुहूर्त जाणून घ्या, 30 वर्षांनंतर येणार दुर्मिळ योग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Legislative Council election : विधान परिषदेतून आज 15 आमदार निवृत्त होणार; 3 सदस्य निवडणूक जिंकून पुन्हा सभागृहात
विधान परिषदेतून आज 15 आमदार निवृत्त होणार; 3 सदस्य निवडणूक जिंकून पुन्हा सभागृहात
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
Hindi OTT Web Series : हिंदी वेब सीरिजमध्ये मराठी अभिनेत्रींची हवा, एकाच वेळी दोघींचे ओटीटीवर पदार्पण
हिंदी वेब सीरिजमध्ये मराठी अभिनेत्रींची हवा, एकाच वेळी दोघींचे ओटीटीवर पदार्पण
Anant Ambani Radhika Merchant Wedding Function :  गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 4 जुलै 2024 | ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 04 June 2024Vasant More Meet Uddhav Thackeray : वसंत मोरे उद्धव ठाकरेंची भेट घेणारSanjay Raut On Narendra Modi : पंतप्रधानच सगळ्यात मोठा बुवा आहे,  भोंदुगिरी करतात- राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Legislative Council election : विधान परिषदेतून आज 15 आमदार निवृत्त होणार; 3 सदस्य निवडणूक जिंकून पुन्हा सभागृहात
विधान परिषदेतून आज 15 आमदार निवृत्त होणार; 3 सदस्य निवडणूक जिंकून पुन्हा सभागृहात
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
Hindi OTT Web Series : हिंदी वेब सीरिजमध्ये मराठी अभिनेत्रींची हवा, एकाच वेळी दोघींचे ओटीटीवर पदार्पण
हिंदी वेब सीरिजमध्ये मराठी अभिनेत्रींची हवा, एकाच वेळी दोघींचे ओटीटीवर पदार्पण
Anant Ambani Radhika Merchant Wedding Function :  गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
Hardik Pandya Natasa Stankovic :  हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
आज राज्यात पाऊस पडणार का? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? 
आज राज्यात पाऊस पडणार का? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? 
Hardik Pandya Team India: विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण दिल्ली विमानतळावर उतरताच हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण विमानतळावर उतरताच हार्दिकच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
Team India: अखेर जे बघण्यासाठी डोळे आसुसले होते तो क्षण आला... रोहित शर्माने एअरपोर्टवर उतरताच वर्ल्डकप उंचावला
रोहित शर्माने गर्दीच्या दिशेने पाहून विश्वचषक उंचावला अन् दिल्ली एअरपोर्टवर एकच जल्लोष
Embed widget