Vat Savitri Vrat : वटपौर्णिमेचा मुहूर्त जाणून घ्या, 30 वर्षांनंतर येणार दुर्मिळ योग
Vat Savitri Vrat 2022 : वटपौर्णिमा 14 जून 2022 रोजी दिवशी तीस वर्षांनंतर सर्वार्थ सिद्धी योगात सोमवती अमावस्या येत आहे.
![Vat Savitri Vrat : वटपौर्णिमेचा मुहूर्त जाणून घ्या, 30 वर्षांनंतर येणार दुर्मिळ योग vat savitri vrat 2022 puja muhurt know vat savitri vrat pujan samagri list and puja vidhi Vat Savitri Vrat : वटपौर्णिमेचा मुहूर्त जाणून घ्या, 30 वर्षांनंतर येणार दुर्मिळ योग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/29/793057cd1f8b698a9b1163cd6bd42aab_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vat Savitri Vrat 2022 : वटपौर्णिमा (Vat Purnima) 14 जून 2022 रोजी आहे. वटपौर्णिमेला वट सावित्री (Vat Savitri Vrat) अमावस्या पूजा असेही म्हणतात. हे व्रत जेष्ठ महिन्यातील अमावास्येला केलं जातं. पुराणातील आख्यायिकेत सांगितल्याप्रमाणे वट सावित्रीचे व्रत सत्यवान आणि सावित्री यांना समर्पित आहे. स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. आचार्य शुक्ल यांनी सांगितले की 13 जून रोजी दुपारी तीन वाजल्यापासून अमावस्या तिथी सुरू होईल. 30 मे रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील.
तीस वर्षांनंतर सर्वार्थ सिद्धी योगात सोमवती अमावस्या येत आहे. वट सावित्री अमावस्येला वटवृक्षाची पूजा केली जाते, मात्र सोमवती अमावस्येमुळे यावेळी पिंपळाच्या झाडाचीही पूजा केली जाणार आहे. महिलांनी पिंपळावर मेकअपचे साहित्य अर्पण करताना, कच्चे सूत गुंडाळून 108 प्रदक्षिणा केल्याने अखंड सौभाग्य आणि सुख-समृद्धी वाढते.
अमावस्या तिथी :
अमावस्या तिथी सुरू : 13 जून 2022 रोजी उत्तर रात्री 09 वाजून 03 मिनिटे
अमावस्या तारीख समाप्ती : 14 जून 2022 रोजी सायं. 05 वाजून 22 मिनिटे
वट सावित्री अमावस्या पूजा विधी :
- या पवित्र दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आटोपून घरात देवासमोर दिवा लावावा.
- या पवित्र दिवशी वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.
- सावित्री आणि सत्यवानाच्या मूर्ती वटवृक्षाखाली ठेवाव्यात.
- यानंतर मूर्ती आणि झाडाला जल अर्पण करावे.
- यानंतर पूजेचे सर्व साहित्य अर्पण करावे.
- सात वेळा प्रदक्षिणा करताना झाडाला लाल धागा बांधावा.
- तसेच या दिवशी व्रत कथा ऐकावी.
वट सावित्री व्रताची कथा :
सावित्रीचा विवाह अश्वपतीचा मुलगा सत्यवान याच्याशी झाला होता. नारदजींनी अश्वपतीला सत्यवानाचे गुण आणि परमात्मा असण्याविषयी सांगितले होतं. पण लग्नाच्या 1 वर्षानंतरच सत्यवानचा मृत्यू होणार असंही सांगण्यात आहे. मात्र तरीही सावित्रीला फक्त सत्यवानाशीच लग्न करायचे होते. सत्यवान आपल्या आई-वडिलांसोबत जंगलात राहत होता. लग्नानंतर सावित्रीही त्यांच्यासोबत राहू लागली. नारदजींनी सत्यवानाच्या मृत्यूची वेळ आधीच सांगितली होती, म्हणून सावित्रीने अगोदरच उपवास सुरू केला. जेव्हा सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आला तेव्हा तो लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊ लागला. सावित्री म्हणाली की, मी पण तुझ्यासोबत जंगलात येते. सत्यवान जंगलात झाडावर चढू लागताच त्याच्या डोक्यात तीव्र वेदना जाणवू लागल्याने तो झाडावरून खाली कोसळला. सावित्रीने सत्यवानाचे डोके मांडीवर ठेवले. काही वेळाने सावित्रीने पाहिले की, यमराजाचे दूत सत्यवानाचे प्राण न्यायला आले आहेत. सावित्रीने यमराजांना थांबवले आणि सांगितले की, माझा नवरा जिथे जाईल तिथे मी त्याच्या मागे जाईन, हा माझा धर्म आहे. सावित्रीच्या पुण्यधर्मावर यमराज खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वरदान मागायला सांगितले. यावेळी सावित्रीने चलाखीने एकाच वरदानात तीन इच्छा पूर्ण करण्यासाठी वरदान मागितला. सावित्रीने यमराजांकडे वरदान मागितला की, मला माझ्या सासू-सासऱ्यांच्या मांडीवर बसून माझ्या 100 पुत्रांना चांदीच्या चमच्याने जेवताना पाहायचं आहे. हे वरदान ऐकून यमराजही चकित झाले. त्यांनी सावित्रीला वरदान देत सत्यवानाचा प्राण परत केला. सावित्रीच्या वरदानामुळे या दिवशी तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळाले, तिच्या सासू-सासऱ्यांना दृष्टी मिळाली आणि त्यांना धनसंपत्तीही लाभली. तेव्हापासून जीवन, सुख, शांती, ऐश्वर्य, कीर्ती, ऐश्वर्य मिळण्यासाठी हे व्रत केलं जातं.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)