Nepotism | मराठी सिनेसृष्टीतही घराणेशाही, मक्तेदारी चालते : महेश टिळेकर
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक, निर्माते महेश टिळेकर यांनी मराठी इंडस्ट्रिमध्येही घराणेशाही चालत असल्याचा आरोप केला आहे.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड क्षेत्रातील घराणेशाहीवर आरोप होऊ लागले आहेत. अभिनेत्री कंगना रनौत हिने सुशांतची आत्महत्या नाही तर प्लॅन मर्डर असल्याचा गंभीर आरोप बॉलिवूड मधील प्रस्थापितांवर केला आहे. त्यानंतर आता दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी देखील मराठी इंडस्ट्रीतही घराणेशाही आहे, मक्तेदारी चालते. पडद्यामागून ही सूत्रं हलवली जातात, असं म्हटलं आहे. निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी मांडलंय. फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी यावर भाष्य केलंय.
मराठी चित्रपट क्षेत्रात कोणी नवीन आलं असेल, काही चांगलं काम करत असेल, कोणी पुढे जात असेल तर त्याचे पाय खेचण्याचं काम इथेही केलं जातं. एखादा त्याच्या कामाने नावारुपास आलेल्या कलाकारालाही संपवण्याचे प्रयत्न काही प्रस्थापित मंडळी करत असतात. मात्र, ही लोकं स्वत:ला फार शहाणे समजतात. समोरून हे वार करत नाहीत, तर पडद्यामागून ही सूत्र हलवली जातात, अशी टीका त्यांनी केली आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येबाबत पोलीस चौकशी सुरू, बॉलिवूडमधील दिग्गजांची चौकशी होण्याची शक्यता
माझ्यावरही प्रयोग झाले माझ्या बाबतीतही असेच प्रयोग झाले. मला अनेकांनी तुला इंडस्ट्रीतून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या. मी शेतकरी कुटुंबातून मी इथवर आलो आहे. मला कोणाचाही पाठिंबा नसतानाही मी या क्षेत्रात माझी जागा निर्माण केली. ‘मराठी तारका’ या कार्यक्रमाचं कोणीच कधी कौतुक केलं नाही. चित्रपट प्रदर्शनापूर्वी ही लोकं अनाथाश्रमात जातात, खोटंखोटं रडतात आणि त्यांची प्रसिद्धी केली जाते. पण प्रामाणिकपणे काम केलेल्यांचं कौतुक केलं जात नाही.”
Sushant Singh Rajput Death | फिल्म इंडस्ट्रीतील तणावामुळे सुशांत लो फील करत होता, वडिलांचा जबाब
सुशांत घराणेशाहीचा बळी सुशांत हा इंजिनिअरींग पात्रता परिक्षामध्ये टॉपमध्ये आला होता. भौतिकशास्त्र ऑलिम्पियडमध्येही त्याने यश संपादन केले होते. अशात त्याने इंजिनिअरींग सोडून अभिनयात करिअर निवडले. इथेही कमी वेळात त्याने घवघवीत यश मिळवले. तरीही बॉलिवूडमधील घराणेशाहीमुळे त्याचा बळी गेला. बॉलिवूडमधील गुणवत्ता संपवत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Mahesh Tilekar Nepotism | मराठी सिनेसृष्टीतही घराणेशाही, मक्तेदारी चालते : महेश टिळेकर