एक्स्प्लोर

BMC : मुंबई महापालिकेत 150 वर्ष जुने सील यंत्र आजही कार्यरत; अनेक ऐतिहासिक कागदपत्रांवर केलंय शिक्कामोर्तब

BMC Dasara : मुंबई महापालिकेत तब्बल दीडशे वर्ष वय असलेल्या ऐतिहासिक यंत्राने उमटविण्यात येणारा शिक्का आजही तेवढाच ठसठशीत आहे. दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने निमित्ताने या यंत्राचे पूजन करून या यंत्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते

मुंबई :  तब्बल 54 हजार कोटी रुपयांचे आर्थिक बजेट (BMC Budget) असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा (BMC) कारभारही तितकाच मोठा आणि अवाढव्य आहे. येथील प्रत्येक विकासकामे, त्यांच्यासाठी काढण्यात येणाऱ्या निविदा, कागदोपत्री कामकाजही जबाबदारीचे आहे. मात्र या सर्व निविदा, कागदपत्रे यांच्यावर जोपर्यंत एक खास ‘मोहोर’ उमटत नाही तोपर्यंत सदर कंत्राट (Tender, Contract) अंतिम होत नाही. ही खास मोहोर उमटविली जाते ते तब्बल 150 वर्ष जुन्या यंत्राने.  तब्बल 150 वर्ष वय असलेल्या ऐतिहासिक यंत्राने उमटविण्यात येणारा शिक्का आजही तेवढाच ठसठशीत आहे. महानगरपालिका अस्तित्वात आली तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक निविदेवर, महत्त्वाच्या कागदपत्रांवर याच यंत्राद्वारे मोहोर उमटविली जाते. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या प्रत्येक कंत्राटाची अंतिम रक्कम अदा करण्यापूर्वी त्यावर या यंत्राद्वारे मोहोर उमटविणे आवश्यक आहे. दरवर्षी दसऱ्याच्या (Dasara) निमित्ताने निमित्ताने या यंत्राचे पूजन करून या यंत्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते, अशी माहिती महानगरपालिका सचिव (प्र.) संगीता शर्मा यांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेची ऐतिहासिक वास्तू

मुंबई महानगरपालिका इमारत संपूर्ण भारतीयांसाठी आजही एक आकर्षण आहे. या इमारतीची बांधणी ब्रिटिशकालीन आहे. गेल्या शेकडो वर्षांपासून या इमारतीचे सौंदर्य अबाधित आहे. येथे अनेक आश्चर्यकारक आणि कुतूहल वाढविणाऱ्या बाबींचा समावेश आहे. तसेच ही महानगरपालिका आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा भारतातील काही राज्यांच्या अर्थसंकल्पांपेक्षा मोठा आहे. 

महापालिकेचे दस्ताऐवज

मुंबईकरांचे रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षण, पाणीपुरवठा, वाहतूक, पर्यावरण, सुरक्षा, रस्ते आरोग्य आदी विविध नागरी सेवा सुविधांसह अनेक पायाभूत सुविधांबाबत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांच्या सेवेत आहे. यासाठी महानगरपालिका प्रशासनाला अनेकदा लोकाभिमुख निर्णय घ्यावे लागतात, त्यांची अंमलबजावणी करावी लागते. त्यामुळे साहजिकच महानगरपालिका प्रशासनाच्या विविध कागदपत्रांना खूप महत्त्व असते. त्यामुळे या कामगदत्रांवरील लिखाण, त्यावरील शेरे, शिक्के यांनाही खूप अर्थ असतो.  

भक्कम असलेले 150 वर्ष जुने सील यंत्र

महानगरपालिका सचिव (प्र.) संगीता शर्मा यांनी सांगितले की, मुंबई महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासूनचे महत्त्वाचे दस्तावेज आजही महानगरपालिकेच्या सचिव विभागाने जपून ठेवले आहेत. यामध्ये सन 1873 मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या पहिल्या सभेच्या इतिवृत्तापासून अनेक महत्त्वाच्या दस्तावेजांचा समावेश आहे. सचिव कार्यालयातील जुन्या कपाटांमध्ये हा अमूल्य ठेवा गेल्या 150 वर्षांपासून जपून ठेवण्यात आला आहे. या मौल्यवान ठेव्यातील अनेक कागदपत्रांवर एक मोहोर उमटलेली आपल्याला दिसते. गेल्या दीडशे वर्षांपासून ही मोहोर ज्या 'सील' यंत्राद्वारे उमटवली जाते, ते यंत्र सन 1874 मध्ये लंडन येथे तयार केलेले आहे. हे यंत्र अतिशय भक्कम आणि पूर्णपणे लोखंडी बनावटीचे असून, त्याद्वारे महत्त्वाच्या कागदपत्रांवर मोहोर उमटविली जाते. विशेष बाब म्हणजे जोपर्यंत ही मोहोर उमटत नाही, तोपर्यंत या कागदांना काहीच अर्थ नसतो. या यंत्राचे अनेकांना अप्रुप असून, महानगरपालिका सचिव विभागात हे यंत्र गेली तब्बल दीडशे वर्ष अव्याहतपणे कार्यरत आहे.

अशी उमटते बृहन्मुंबई महानगरपालिकेची मोहोर

महानगरपालिकेच्या सचिव कार्यालयातील 'सील' यंत्र ब्रिटिशकालीन असून, त्याची बनावटही पुरातन आहे. लोखंडापासून तयार केलेले हे यंत्र एका मोठ्या लाकडी टेबलावर बसविण्यात आले आहे. हे यंत्र वापरताना सुरुवातीला एका मोठ्या लोखंडी तुळईचा वापर करण्यात येतो. या तुळईच्या दोन्ही बाजूला लोखंडाचे दोन मोठे गोळे जोडलेले आहेत. अत्यंत वजनदार असणारी ही तुळई यंत्राच्या वरती ठेवण्यात येते. त्यानंतर या यंत्राच्या खालच्या भागात असलेल्या छोट्याच्या लोखंडी फटीत ज्यावर मोहर उमटवायची आहे ते महत्त्वाचे कागद ठेवले जातात. त्यानंतर यंत्राच्या वर ठेवण्यात आलेली वजनदार लोखंडी तुळई उजवीकडून डावीकडे फिरविली की, लोखंडी फटीचे दोन्ही लोखंडी भाग एकमेकांवर दाबले जातात आणि कागदावर ठसठशीत मोहोर उमटते.

गेल्या 150 वर्षांपासून हे यंत्र मुंबई महानगरपालिकेत अविरतपणे कार्यरत असून, त्याद्वारे अनेक महत्त्वाच्या ऐवजांवर ‘शिक्कामोर्तब’ करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रथेनुसार या यंत्राचे दरवर्षी दसऱ्याच्या आदल्या दिवशी पूजन करून या यंत्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते, अशीही माहिती संगीता शर्मा यांनी दिली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget