एक्स्प्लोर

Dasara Melava 2024 : दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार? शिंदे गटाने शिवाजी पार्कवरचा दावा सोडला? 

Dasara Melava 2024 : यंदाही दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. नेमकं काय कारण आहे?

Dasara Melava 2024 : गेल्या अनेक दिवसांपासून यंदाच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क कोणाला मिळणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तर दुसरीकडे या वर्षीही शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसऱ्याच्या (Dasara Melava) मुहूर्तावर ठाकरेंचाच आवाज घुमणार असल्याचं बोललं जातंय. कारण शिवसेना ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं, यासाठी मागील आठ महिन्यात मुंबई महापालिकेला अर्जासोबत तीन स्मरणपत्र देण्यात आल्याची माहिती आहे, तर शिवसेना शिंदे गटाकडून या संदर्भात अद्याप कोणताही अर्ज केला नसल्याची माहिती सुत्रांकडून कळत आहे. त्यामुळे यंदाही दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. 

गणेशोत्सवानंतर महापालिका घेणार निर्णय

दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात कुठल्याही प्रकारे अडचण येऊ नये यासाठी आठ महिन्याआधीच शिवसेना ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखांकडून अर्ज आणि स्मरणपत्र देण्यात आले आहे. तर सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने दसरा मेळाव्याच्या परवानगी संदर्भात मुंबई महापालिका याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. 18 सप्टेंबरनंतर मुंबई महापालिका परवानगी संदर्भात योग्य तो निर्णय घेऊन संबंधित अर्जदाराला याबाबत कळवणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मेळावा यासाठी अद्याप अर्ज केली नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला  दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मिळावं याची प्रतीक्षा आहे

शिंदे गटाला मेळावा दुसरीकडे घेण्याचे संकेत 

शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यासाठी वर्ष 2023 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला परवानगी मिळाली होती. मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला ही परवागनी दिली होती. त्यानुसार ठाकरे गटाचा दसरा मेळावा 24 ऑक्टोबरला शिवतीर्थवर पार पडला होता. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क ऐवजी दुसरीकडे घेण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार शिंदे गटाने शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेतला होता. अखेर महापालिकेने शिवसेना ठाकरे गटाला परवानगी दिली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lebanon Pager Blasts : इस्त्रायलच्या 'मोसाद'चा थरकाप? लोकांच्या खिशात अन् हातात फुटलेले पेजर्स म्हणजे काय, बॅटरी हॅक करून स्फोट घडवले?
इस्त्रायलच्या 'मोसाद'चा थरकाप? लोकांच्या खिशात अन् हातात फुटलेले पेजर्स म्हणजे काय, बॅटरी हॅक करून स्फोट घडवले?
Ajit Pawar Camp: थांबायचं नाय आता जिंकायचं हाय, अजितदादांच्या राष्ट्रवादीची प्रचार मोहीम जोरात
थांबायचं नाय आता जिंकायचं हाय, अजितदादांच्या राष्ट्रवादीची प्रचार मोहीम जोरात
Manoj jarange: देवेंद्र फडणवीसांना कितीही गणित करु द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगेंचा एल्गार
देवेंद्र फडणवीसांना कितीही गणित करु द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगेंचा एल्गार
Kailash Darshan With MI-17 : थेट MI-17 हेलिकॉप्टरने कैलास दर्शन करा! फक्त किती हजारात प्रवास अन् कोणत्या वर्षांपर्यतच्या व्यक्तींना प्रवास करता येणार?
थेट MI-17 हेलिकॉप्टरने कैलास दर्शन करा! फक्त किती हजारात प्रवास अन् कोणत्या वर्षांपर्यतच्या व्यक्तींना प्रवास करता येणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramesh Bornare On Uddhav Thackeray : 2019 मध्ये उद्धव ठाकरे पैसे घेऊन उमेदवारी देणार होते : बोरनारेLalbaugcha Raja Visarajan 2024 : पुढच्या वर्षी लवकर या.. लालबागच्या राजाला अखेरचा निरोपLalbaugcha Raja Visarjan : राजाची शान भारी, राजाचा थाट भारी! राजाचं विसर्जन, भक्तांचे डोळे पाणावलेLalbaugcha Raja Visarjan :खोल समुद्र..., तब्बल 50 बोटींची सुरक्षा, विसर्जनाचे Exclusive ड्रोन दृश्यं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lebanon Pager Blasts : इस्त्रायलच्या 'मोसाद'चा थरकाप? लोकांच्या खिशात अन् हातात फुटलेले पेजर्स म्हणजे काय, बॅटरी हॅक करून स्फोट घडवले?
इस्त्रायलच्या 'मोसाद'चा थरकाप? लोकांच्या खिशात अन् हातात फुटलेले पेजर्स म्हणजे काय, बॅटरी हॅक करून स्फोट घडवले?
Ajit Pawar Camp: थांबायचं नाय आता जिंकायचं हाय, अजितदादांच्या राष्ट्रवादीची प्रचार मोहीम जोरात
थांबायचं नाय आता जिंकायचं हाय, अजितदादांच्या राष्ट्रवादीची प्रचार मोहीम जोरात
Manoj jarange: देवेंद्र फडणवीसांना कितीही गणित करु द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगेंचा एल्गार
देवेंद्र फडणवीसांना कितीही गणित करु द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगेंचा एल्गार
Kailash Darshan With MI-17 : थेट MI-17 हेलिकॉप्टरने कैलास दर्शन करा! फक्त किती हजारात प्रवास अन् कोणत्या वर्षांपर्यतच्या व्यक्तींना प्रवास करता येणार?
थेट MI-17 हेलिकॉप्टरने कैलास दर्शन करा! फक्त किती हजारात प्रवास अन् कोणत्या वर्षांपर्यतच्या व्यक्तींना प्रवास करता येणार?
Sanjay Raut : प्लॅनिंग परदेशात, अंमलबजावणी देशात, राहुल गांधींच्या सुरक्षेवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
प्लॅनिंग परदेशात, अंमलबजावणी देशात, राहुल गांधींच्या सुरक्षेवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Gold Silver prices: पितृपक्षाच्या सुरुवातीला सोन्याचांदीचा भाव घसरला, मुंबईकरांना किंचित दिलासा, तुमच्या शहरातील भाव काय?
पितृपक्षाच्या सुरुवातीला सोन्याचांदीचा भाव घसरला, मुंबईकरांना किंचित दिलासा, तुमच्या शहरातील भाव काय?
500000 चे 1200000 रुपये करणारी LIC ची भन्नाट स्कीम, फक्त 1000 रुपयांपासून करता येते गुंतवणूक!
500000 चे 1200000 रुपये करणारी LIC ची भन्नाट स्कीम, फक्त 1000 रुपयांपासून करता येते गुंतवणूक!
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
Embed widget