एक्स्प्लोर

मुंबईत दहीहंडीचा जल्लोष, अनेक ठिकाणी थरांचा थरार, ठाण्यात नऊ थरांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. ठाण्यात मनसेच्या दहीहंडीत थरांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केला. जय जवानकडून 10 थरांच्या प्रयत्नात 9 थर लावले गेले.

मुंबई : गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला.   ठाण्यात मनसेच्या दहीहंडीत थरांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केला. जय जवानकडून 10 थरांच्या प्रयत्नात 9 थर लावले गेले. तर   मुंबईतल्या दादरच्या आयडियल गल्लीतील दहीहंडीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा साकारण्यात आला.  घाटकोपरमध्ये क्रांती क्रीडा गोविंदा पथकाच्या वरच्या थरावर गणपती बाप्पा विराजमान झाल्याचे दाखवण्यात आले. ठाण्यातील नौपाडामध्ये मनसेची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. जय जवाननं तिथे 10 थर लावण्याचा प्रयत्न केला, मात्र नऊ थर लावल्यावर ते कोसळले. मात्र असं असलं तरी त्यांनी नऊ थरांच्या विश्वविक्रमाशी त्यांनी बरोबरी केली आहे. ठाण्यातीलच संस्कृती प्रतिष्ठान या शिवसेनेच्या दहीहंडीत जय जवाननं नऊ थर लावले. मुंबई उपनगरात घाटकोपरच्या भटवाडी विभागात लोकसेवा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सालाबादप्रमाणे दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी अनेक पथकांनी सलामी देण्यासाठी हजेरी लावली आहे. वरळीच्या बावन चाळ येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा प्रगती क्रीडा मंडळाचा उत्साह पाहायला मिळाला. या ठिकाणी मानव साखळी करून ढोल ताशात हे गोविंदा पथक बजरंगबलीची गदा घेऊन दहीहंडी फोडयाला नाचत निघाले. 47 वर्ष जुन्या या गोविंद पथकाचा पारंपरिक उत्साह पाहण्याजोगा होता. दादर प्लाजा कॉर्नर जवळ सुद्धा दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. या ठिकानी महाराष्ट्रातलं पाहिलं गोविंद पथक यामध्ये अंध- दिव्यांग गोविंदा हंडी फोडायला सज्ज झाले होते. 2 ते 3 महिने मेहनत करून हे अंध गोविंदा आता आजच्या दिवसासाठी सज्ज झाले. भांडुपमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईव्हीएम विरोधात पुकारलेल्या आंदोलनला दहीहंडी उत्सवात सुद्धा प्रचार केला गेला. भांडुपमध्ये 'मतदानात ईव्हीएम नको, बॅलेट पेपरचा हवा' अशा प्रकारचा संदेश असणारे 5 हजार टी शर्ट विविध गोविंदा पथकांना वाटप केले. मुंबईचा सर्वात जुनं गोविंदा माझगाव ताडवाडी गोविंदा पथक याला यावर्षी 74 वर्ष पूर्ण झाले. दादर, शिवडी, लालबाग करत आता हे गोविंद पथक ठाण्याच्या दहीहंडी उत्सवात सहभागी झाले. जवळपास 800 ते 1000 गोविंदा एकत्र येऊन दोन महिन्याच्या तयारी नंतर आठ थरांची सलामी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget