एक्स्प्लोर
मुंबईत गॅस सिलेंडरच्या स्फोटानं घर कोसळून तिघांचा मृत्यू, 12 जखमी
मुंबई: मानखुर्दच्या महाराष्ट्रनगरमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे घर कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजते आहे. तर 12 जण या अपघातात जखमी असल्याची माहिती मिळते आहे. सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
रेल्वे स्थानकाच्या लगतच्या असणाऱ्या चाळीतील एक इमारत घर अचानक कोसळली. शेजारच्या घरांवर या इमारतीचा ढिगारा कोसळला. या ढिगाऱ्याखाली 15 जण अडकले. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.
जखमींवर सध्या राजावाडी आणि शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळं इमारत कोसळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे..
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement