एक्स्प्लोर

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाला नवे वळण? किरण गोसावी आणि प्रभाकर साईलचे व्हाट्सअप चॅट 'माझा'च्या हाती

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील पंच किरण गोसावी आणि प्रभाकर साईलचे व्हाट्सअप चॅट 'एबीपी माझा'च्या हाती लागले आहेत.

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहे. आता एनसीबीच्या दक्षता विभागाकडून या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. मात्र, त्याचदरम्यान एबीपी माझाच्या हाती किरण गोसावी आणि प्रभाकर साईलचे काही व्हाट्सअप चॅट लागले आहेत. ज्यामध्ये या कारवाईवर अजून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. इतकंच नाही तर या चॅटमुळे किरण गोसावीने जे दावे केले आहेत तेही कुठेतरी फेल होताना दिसत आहेत.

2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने क्रूझ ड्रग्ज पार्टीमध्ये छापा मारला आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली. त्यानंतर शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांची खंडणी किरण गोसावी आणि सॅमकडून मागण्यात आल्याचा आरोप प्रभाकर साईलने केला होता. मात्र, याचं उत्तर प्रभाकर साईल आणि किरण गोसावी यांच्यामध्ये झालेल्या चॅटमध्येच आहे. प्रभाकर साईल आणि किरण गोसावी हे दोघे क्रूझ प्रकरणात एनसीबीकडून पंच होते. मात्र, दोघांचीही वक्तव्ये एकमेकांपासून वेगळी आहेत. 

Sameer Wankhede : आम्हाला लटकवण्याच्या, जाळून टाकण्याच्या धमक्या येत आहेत : क्रांती रेडकर

आर्यन खानला अटक केल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या खंडणीची मागण्यात आली नाही. पूजा ददलानीशी देखील बोलणं झालं नसल्याचा दावा किरण गोसावीकडून करण्यात आला होता. मात्र, प्रभाकर साईलच्या मोबाईलमधून प्रभाकर साईल आणि किरण गोसावीचे चॅट माझाच्या हाती लागले आहेत. या प्रकरणातवगे पंच आणि किरण गोसावीचा अंगरक्षक प्रभाकर साईल याच्या मोबाईलवर दुसऱ्या दिवशी किरण गोसावीने एक मॅसेज पाठवला होता. हा मॅसेज 3 ऑक्टोबरला करण्यात आला होता, ज्यामध्ये सांगण्यात आलं होतं की तू हाजी अलीला जा आणि तुला सांगितलेल काम पूर्ण कर आणि लगेच ये.

आता प्रश्न हा निर्माण होतो की किरण गोसावीने प्रभाकर साईलला असं कुठंल काम सांगितलं होतं? प्रभाकर कोणाला भेटायला गेला होता? हा प्रश्न यासाठीच महत्त्वाचा आहे. कारण, या प्रश्नाच्या उत्तरातच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा आहे. कारण प्रभाकरने सांगितलं होतं की 3 ऑक्‍टोबरला किरण गोसावीने त्याला सांगितलं की हाजीअली येथील महालक्ष्मी, ताडदेव येथील इंडियाना हॉटेल जवळ जा आणि 50 लाख रु घे. ज्यानंतर 5102 नंबरच्या गाडीमध्ये दोन व्यक्ती आले आणि त्याला पन्नास लाख रुपये देऊन निघून गेले.

Sameer Wankhede Likely Transferred : समीर वानखेडेंची बदली होणार?

आता प्रश्न असा उपस्थित होतो की ती गाडी कोणाची होती? ते पन्नास लाख रुपये कोणी दिले? गोसावीने हे पैसे स्वतःसाठी घेतले होते का? किंवा त्याने एनसीबीच्या वतीने सेटलमेंटसाठी हे पैसे घेतले होते का? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होऊ शकतो.

तर दुसरीकडे फोटो आणि व्हिडिओमध्ये क्रुझमध्ये जेव्हा एनसीबीकडून कारवाई करण्यात आली. त्यावेळेसचेसुद्धा फोटो आहेत, ज्यामध्ये समीर वानखेडे कारवाई करत आहेत आणि किरण गोसावी यांच्या अतिशय निकट उभा असून त्याच्या संपूर्ण कारवाईमध्ये कितपत सहभाग आहे ते दाखवत आहेत.

Nawab Malik : समीर वानखेडेंनी 26 बनावट केसेस करत लोकांना फसवलं?, नवाब मलिक यांनी दिला पुरावा 

किरण गोसावीने प्रभाकर साईलला गेटवरच उभा केला आणि जी लोकं क्रुझवर येणार होती, त्यांचे फोटो आधीच त्याने प्रभाकरला पाठवले होते. जेणेकरून प्रभाकर त्यांना ओळखू शकेल आणि किरण गोसावीला लगेच त्यांनी एन्ट्री केल्यावर सुचना देईल. याचा अर्थ एनसीबीने त्यांचे टार्गेट आधीच आयडेंटिफाय केले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget