(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sameer Wankhede : आम्हाला लटकवण्याच्या, जाळून टाकण्याच्या धमक्या येत आहेत : क्रांती रेडकर
Sameer Wankhede : समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.
Sameer Wankhede : मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर आरोपांमुळे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे अडचणीत आलेत. चौकशीच्या पार्श्वभूमीवर ते दिल्लीत एनसीबी मुख्यालयात पोहोचलेत. तर इकडे मुंबईत समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. मला, मुलांना, कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही क्रांती रेडकर यांनी केलाय. राज्य सरकारकडून आम्हाला संरक्षण मिळालं आहे. त्यानंतरही आम्हाला धमक्यांचं सत्र सुरु आहे, असेही रेडकर म्हणाल्या. समीर वानखेडे सत्याच्या मार्गानं काम करतात, ते अनेकांना खटकतं, असा बचाव क्रांती रेडकर यांनी केला. समीर वानखेडे यांच्यावर केलेले सर्व आरोप चुकीचं असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितलं.
समीर वानखेडे यांच्यावर केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. पुरवे असतील तर कोर्टात जावं. असा टोला क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांना लगावला. समीर वानखेडे यांच्यावरील आरोप चुकीचे आहेत. समीर वानखेडे सत्याच्या मार्गानं का करतात, ते अनेकांना खटकतं. पुरावे असतील तर कार्टात जावं. ट्विटरवर लिहून काय होणार. या प्रकरणातून समीर वानखे बाहेर पडतील. नेहमी सत्याचा विजय होतो. तेव्हा मला त्याची काहीही काळजी वाटत नाही. समीर हे निर्दोष आहेत, असे रेडकर म्हणाल्या. नवाब मलिक यांना वेळच उत्तर देईल, असेही त्या म्हणाल्या. आम्हाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. आपत्तीजनक भाषेत वक्तवे केली जात आहेत. सुरक्षा असतानाही आम्हाला धमक्या दिल्यात जात आहेत. आम्हाला मारण्याची धमकीही दिली जात आहे. या सगळ्याचा मानसिक त्रास होत आहे. मराठी असल्याचा अभिमान आहे. माझ्या महाराष्ट्रात मला कुणीतरी धमकी देतेय, याची भिती वाटते. अँटी समीर वानखेडे जी लोकं आहेत. ती प्रचंड त्रास देत आहेत. आम्हाला ट्रोल केलं जातेय. मारण्याच्या धमक्या दिल्या जातायेत. लटकून टाकतील, जाळून टाकतील, अशा धमक्या येतात, असे रेडकर म्हणाल्या.
समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांच्यासह समीर वानखेडे यांची बहिणी जास्मिन वानखेडे यांनीही पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना जास्मिन यांनी बोलताना नवाब मलिकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. 'पुरावे असतील तर कोर्टात जावं, ट्वीट करुन लोकांचा वेळ वाया का घालवता?', असं म्हणत जास्मिन वानखेडे यांनी थेट आवाहन केलं आहे. तसेच मला, कुटुंबाला रोज धमकीचे, जीवे मारण्याचे फोन येताहेत, असंही जास्मिन वानखेडे यांनी बोलताना सांगितलं.