एक्स्प्लोर

Cruise Drug Case : आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी; कोर्टात NCB चे गंभीर आरोप, जामीन मिळणार?

Cruise Drug Case : बुधवारी जामीन अर्जावर बराच वेळ सुनावणी झाली. आज पुन्हा कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे आर्यनला जामीन मिळणार की, कोठडीत वाढ होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Cruise Drug Case : गेल्या 7 दिवसांपासून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये बंद असलेला आर्यन खानवर आरोपांचं सत्र सुरुच आहे. क्रूझ ड्रग केस प्रकरणी जेलमध्ये असलेल्या आर्यन खानच्या आडचणी आणखी वाढणार की, जामीन मिळणार याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. काल (बुधवारी) आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी वेळी एनसीबीनं कोर्टात स्पष्टीकरण दिलं. आर्यन खानची समाजातील प्रतिष्ठा पाहता, तो बाहेर आल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो. तसेच आपलं वजन वापरून त्याच्यावतीनं पुराव्यांशी छेडछाड आणि अन्य साक्षीदारांवर दबावही आणला जाऊ शकतो, असा दावा करत एनसीबीनं बुधवारी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला. 

बुधवारी जामीन अर्जावर बराच वेळ सुनावणी झाली. कोर्टात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या वकिलांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु, बराच वेळ सुनावणी झाल्यामुळं कालची सुनावणी टळली. आज 12 वाजता या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे. 

आरोपीकडे अमली पदार्थ सापडोत अथवा न सापडोत, एनडीपीएस कायद्यातील कलम 29 नुसार अशा कटात सामील असणं हा एक गंभीर गुन्हा आहे. तुमच्याकडे ड्रग्ज सापडले नाही तरी जेव्हा एनडीपीएस कायद्यातील कलम 29 लावलं जातं तेव्हा आरोपी मुख्य सुत्रधाराइतकाच दोषी असतो असं एनसीबीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी कोर्टाला सांगितलं. 

कोर्टाच्या कामकाजाची वेळ संपल्यानं बुधवारची कारवाई गुरूवारपर्यंत स्थगित करण्यात आली. गुरूवारी दुपारी 12 वाजता एनसीबीचा युक्तिवाद पुन्हा सुरू होईल. त्यानंतर विशेष एनडीपीएस कोर्टाचे न्यायाधीस वी.वी.पाटील हे आपला फैसला कधी देतात याकडे साऱ्यांच्या नजरा राहतील. कारण सणासुदीच्या काळात आलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे गुरूवारी जर हा फैसला आला नाही तर आर्यन खानचा जेलमधील मुक्काम लांबण्याची दाट शक्यता आहे. एनसीबीनं या प्रकरणात एकूण 20 जणांना अटक केली आहे. ज्यातील चार हे ड्रग पेडलर्स असून त्यातील दोन परदेशी नागरीक आहेत. यांच्याकडनं व्यावसायिक मात्रेत ड्रग्ज हस्तगत करण्यात आली आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालयालाही आम्ही या प्रकरणाची माहिती दिली असून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीशीही याचे धागेदोरे शोधले जात आहेत. बुधवारी एनसीबीनं याप्रकरणातील आरोपी आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि अन्य आरोपी मुनमुन धमेचा यांच्या जामीन अर्जाला विरोध करत आपलं उत्तर कोर्टात सादर केलं. या प्रकरणातील अन्य पाच आरोपींच्या जामीन अर्जावर 22 ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करू असं एनआयएनं स्पष्ट केलं.

दरम्यान बुधवारच्या सुनावणीत आर्यन खानतर्फे ज्येष्ठ कायदेतज्ञ अमित देसाई यांनी आर्यन खानच्या जामीनावर जोरदार युक्तिवाद केला. एनसीबीनं काय केस बनवलीय, यापेक्षा सध्या आर्यन खानचा जामीन आमच्यासाठी महत्त्वाचा आहे या वाक्यासह त्यांनी युक्तिवादाला सुरूवात केली. 2 ऑक्टोबर रोजी आर्यन खान एका निमंत्रणावर त्या क्रुझवर गेला होता. निमंत्रण देणाऱ्याला अद्याप अटक केलेली नसल्याचं त्यांनी कोर्टाला आवर्जून सांगितलं. आर्यन टर्मिनलवरून क्रुझमध्ये प्रवेश करत असतानाच अचानकपणे एनसीबीनं तिथं धाड टाकली. त्यानंतर त्यांना शोध असलेल्या काही व्यक्तींचीच त्यांनी झाडाझडती सुरू केली आणि त्यात त्यांना एकापाठोपाठ एक अमली पदार्थ सापडत गेले. एकूणच एनसीबीनं इथं खूप चांगलं काम केलंय असं दाखवलं गेलं. मात्र, त्यांची माहिती चुकीची होती. कारण, तपासात केवळ काही जणांकडेच अमली पदार्थ सापडले आणि तेही फारच कमी प्रमाणात होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्यन खानकडे कोणताही अमली पदार्थ सापडलेला नाही. तो अमली पदार्थ इतरांमार्फत घेत होता, असा जर त्यांचा दावा असेल तर तो साफ चुकीचा आहे. कारण मुळात हे आरोप सिद्ध करण्यासाठी आरोपीकडून अमली पदार्थ हस्तगत होणं गरजेचं असतं.

याशिवाय आर्यन खानकडनं रोख रक्कमही हस्तगत झालेली नाही. त्यामुळे त्याचा हे इतरांकडे सापडलेले अमली पदार्थ विकत घेण्याचा किंवा इतरांना विकण्याचा बेत होता या गोष्टीही सिद्ध होत नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्यनविरोधातील कलमांखाली त्याला जास्तीत जास्त एका वर्षाची शिक्षा होऊ शकते. त्याआधारावर कायद्यानं त्याला जामीन मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे, असा दावा अमित देसाईंनी केला. एनसीबीचा दावाय की, नंतर अटक केलेल्या काही आरोपींसोबत आर्यनची चौकशी करायचीय. कारण सुरूवातीपासूनच आर्यनचा याप्रकरणात अटक केलेल्या प्रत्येक आरोपीशी संबंध जोडण्याचा एनसीबीचा प्रयत्न आहे. त्यांचा हाच प्रयत्न खोडून काढत मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टानं तिस-यांदा आर्यनची पोलीस कोठडी नाकारत त्याला न्यायालयीन कोठडी दिली. त्यामुळे यापुढे आर्यनच्या कोठडीतील चौकशीची गजर नसून त्याला कोर्टानं जामीनास पात्र ठरवल होतं.

मुंबई सारख्या शहरात अमली पदार्थांचं वाढत जाळं तोडण्यासाठी एनसीबीची आणि कर्तबगार अधिकाऱ्यांची गरज आहेच. मात्र, हे काम करत असताना निरपराध लोकांना आणून डांबून ठेवण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही. अशी टिकाही देसाई यांनी कोर्टात केली. तसेच क्रुझवर सापडलेलं अमली पदार्थांचं प्रमाण हे ब-याचं देशात कायदेशीर आहे. 

अटक केलेली मुलं फारच तरूण आहेत, त्यांची कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती नाही. त्यांनी या काळात फार भोगलंय, त्यांना मिळायचा तो धडाही मिळालाय. तेव्हा त्यांचा जामीन मंजूर करावा या टिप्पणीसह देसाईंनी आपला युक्तिवाद संपवला. याप्रकरणातील अन्य दोन आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाही निर्दोष असल्याचा दावा करत त्यांच्या वकिलांनी अधिक वेळ न दवडता आपला युक्तिवाद आटोपता घेतला. आर्यन खान हा सध्या 14 दिवससंच्या न्यायालयीन कोठडीमुळे आर्थर रोड जेलमध्ये आहे. कोरोनाकाळामुळे त्याला सध्या तिथल्या विलगीकरण सेलमध्येच ठेवण्यात आलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Jaysingh Mohite Patil and Uttam Jankar : माढ्यात भाजपला दुसरा धक्का, उत्तम जानकर शरद पवार गटातABP Majha Headlines : 09 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRamdas Kadam On BJP : भाजपने माझ्याविरोधात काम केलं तर परिणाम राज्यात दिसतील -कदमZero Hour Guest Center Uday Samant :सेनेचा बुरुज BJPच्या झेंड्याखाली,किरण सामंतांची मनधरणी कशी केली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
माहीभाईचा जलवा कायम, धोनीची झलक पाहायला चाहत्यांची झुंबड, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
चेन्नई, मुंबई ते लखनौ महेंद्रसिंह धोनीचा जलवा कायम, एकाना स्टेडियमवर चाहत्यांचा जनसागर, व्हिडीओ व्हायरल
Embed widget