Mumbai Corona Update : मुंबईत रुग्णसंख्येतील घट कायम, आज 27 नव्या बाधितांसह 44 जण कोरोनामुक्त
Mumbai Corona Update : मुंबईतील काल प्रमाणे आजही अगदी कमी नवे कोरोनाबाधित आढळले असून त्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या 298 झाली आहे.

Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोनारुग्णांच्या (Mumbai Corona Update) संख्येत कालप्रमाणे आजही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सलग दोन दिवस रुग्णसंख्या 30 हून कमी आढळली आहे. आज केवळ 27 नवे कोरोनाबाधित आढळले असून काल अर्थात शनिवारी ही संख्या 29 होती. मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज देखील एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत नवे 27 कोरोनाबाधित आढळले असून 54 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील कमी झाली असून आज ही संख्या 298 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 27 रुग्णांपैकी केवळ एका रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 28 हजार 495 बेड्सपैकी केवळ 49 बेड सध्या वापरात आहेत.
राज्यात 113 नवे कोरोनाबाधित
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 113 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर फक्त एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सातारा येथे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मागील 24 तासांत राज्यात 283 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 77,23,288 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.11% एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर 1.82% एवढा आहे.
हे ही वाचा -
- Corona Virus : कोरोनाचा पुन्हा धुमाकूळ! जगभरात चौथ्या लाटेचा उद्रेक
- Corona : एक कोरोना पेशंट सापडला तर 'या' देशात लॉकडाऊन, बॉर्डरही केल्या सील...!
- Mumbai Local Train : मुंबईत लोकल प्रवासासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस अनिवार्य
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
