![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Corona Update : मुंबईतील रुग्णसंख्येतील घट कायम, 18 नव्या रुग्णांसह 50 जण कोरोनामुक्त
Mumbai Corona Update : मुंबईतील आज आढळलेल्या नव्या 18 रुग्णांपैकी तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
![Mumbai Corona Update : मुंबईतील रुग्णसंख्येतील घट कायम, 18 नव्या रुग्णांसह 50 जण कोरोनामुक्त COVID19 | Mumbai reports 18 new cases and 50 recoveries in the last 24 hours Mumbai Corona Update : मुंबईतील रुग्णसंख्येतील घट कायम, 18 नव्या रुग्णांसह 50 जण कोरोनामुक्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/02/790a6ff9bc5f3fe04265d8541f297df1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनारुग्णांची(Mumbai Corona Update) आटोक्यात आलेली संख्या आजही कायम आहे. आज 20 हून कमी कोरोनाबाधित आढळल्याने पालिका प्रशासनाला (Mumbai BMC) काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज देखील एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत नवे 18 कोरोनाबाधित आढळले असून 50 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 250 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 18 रुग्णांपैकी तीन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेकडील 26 हजार 151 बेड्सपैकी केवळ 14 बेड सध्या वापरात आहेत.
राज्यात 52 नव्या बाधितांची नोंद
आज राज्यात केवळ 52 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 107 रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 77,25,791 कोरोनाबाधित उपचार घेऊन बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.11 टक्के इतके झाले आहे. राज्यात आज कोरोनामुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली नाही. रविवारी राज्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.87 टक्के इतका आहे. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या कमी झाली असून 866 इतके सक्रिय रुग्ण सध्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
- Coronavirus Cases Today : सुमारे दोन वर्षानंतर कोरोना रुग्णांची संख्या 1000 च्या खाली गेल्या 24 तासात 913 नवे रुग्ण, 13 जणांचा मृत्यू
- Corona in China : चीनमध्ये कोरोनाचा कहर वाढताच, शांघायमध्ये एका दिवसात 8226 रुग्णांची नोंद, जगाची चिंता वाढली
- Maharashtra Corona Update : राज्यात आज 50 रुग्णांची नोंद तर एकही मृत्यू नाही
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)