Mumbai Corona Update : मुंबईत नव्या 168 कोरोनाबाधितांची नोंद, तर 255 जण कोरोनामुक्त
Corona Update : मुंबईमध्ये मंगळवारपाठोपाठ आजही रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत केवळ 168 नवे रुग्ण आढळले असून 255 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
Mumbai Corona Update : मुंबईत (Mumbai) कमी होणारी रुग्णसंख्या सोमवारनंतर मंगळवारी काहीशी वाढल्याचं पाहायला मिळालं. आजही रुग्णसंख्येत काहीसा चढ पाहायला मिळाला आहे. मागील 24 तासांत 168 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. मंगळवारी हीच रुग्णसंख्या 135 होती. दरम्यान आज 255 जण कोरोनामुक्त देखील झाले असून त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. यासह आज मुंबईत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नसून रुग्ण दुपटीच्या दरातही लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या हा दर 3 हजार 758 दिवसांवर गेला आहे.
मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 168 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 255 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 228 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 168 रुग्णांपैकी 17 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 248 बेड्सपैकी केवळ 775 बेड वापरात आहेत. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही 0.02% टक्के इतका झाला आहे.
राज्यात 1151 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
मुंबईनंतर राज्याचा विचार करता राज्यात मागील 24 तासात राज्यात कोरोनाच्या 1 हजार 151 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आज 23 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 2 हजार 594 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज राज्यातील पाच महानगरपालिकांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तर 29 महानगपालिकांमध्ये कोरोनाची एकेरी संख्येची नोंद झाली आहे. तर 47 महानरपालिकांमध्ये कोरोनाचा एकही मृत्यू झालेला नाही.
हे ही वाचा :
- गेल्या 24 तासात देशात 15 हजार 102 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 278 जणांचा मृत्यू
- Mumbai Local : लोकल ट्रेन, मॉल्स येथे केवळ लसीकरण पूर्ण झालेल्याच व्यक्तींना प्रवेश देण्याचा निर्णय आता मागे घ्यायला हवा : हायकोर्ट
- Covid Vaccination : भारतात Covishieldसह अनेक लसी सध्या वापरात, तर 'या' पाच लसींची भारताला प्रतिक्षा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha