Mhada Home: पुणेकरांना घराचं स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी! 90 लाखाचं घर मिळणार फक्त 28 लाखात! कुठे आणि कसा अर्ज करायचा?
Mhada Home: पुण्यातील प्रमुख ठिकाणी अतिशय परवडणाऱ्या दरात घर खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुणे : स्वतःचं घर असावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, पुण्यासारख्या महानगरात वाढत्या घरांच्या किमतींमुळे हे स्वप्न अनेकांसाठी दूरचं झालं आहे. पण आता घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) (mhada home) यांनी मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक विशेष गृहयोजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत म्हाडाच्या लॉटरीद्वारे (mhada home) पुण्यातील प्रमुख ठिकाणी अतिशय परवडणाऱ्या दरात घर खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.(mhada home)
Mhada Home: लोकेशन आहे वाकडमध्ये, तेही हायवेच्या जवळच
कुठे? - पुण्यातील वेगाने विकसित होत असलेल्या वाकड (Wakad) आणि हिंजवडी परिसरात.
प्रकल्प: यश्विन अर्बो सेंट्रो (Yashwin Urbo Centro) या खासगी गृहनिर्माण प्रकल्पात ही घरे आहेत.
जवळ: भूमकर चौक, इंदिरा गांधी कॉलेज आणि मुख्य हायवेला लागून हे ठिकाण आहे.
घराचा प्रकार: 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट्स उपलब्ध आहेत. कार्पेट एरिया साधारण 500 ते 600 स्क्वेअर फूट आहे.
Mhada Home: किमतीत तब्बल 60 लाखांची बचत
या योजनेतील घरांची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. घराची अंदाजित किंमत (बाजारात) - 80 लाख ते 90 लाख रूपये
म्हाडा लॉटरीमधील किंमत -फक्त 28.42 लाख ते 28.74 लाख रूपये यामुळे सर्वसामान्य अर्जदारांची 60 लाख रुपयांपेक्षा जास्त बचत होणार आहे. एवढ्या उत्तम लोकेशनवर, इतक्या कमी किमतीत घर मिळण्याची संधी पुन्हा मिळणार नाही.
Mhada Home: अर्ज कसा आणि कधी करायचा?
अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आणि ऑनलाइन आहे:
म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://lottery.mhada.gov.in
विभाग निवडा: वेबसाईटवर “Pune Board Lottery 2025” हा विभाग निवडा.
अंतिम तारीख: अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2025 रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे.
म्हाडाने सर्व इच्छुक अर्जदारांना विनंती केली आहे की त्यांनी मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी आणि आपल्या स्वप्नातील घरासाठी लवकर अर्ज करावा. या म्हाडाच्या लॉटरीमध्ये शहरातील अनेक ठिकाणी आपल्याला घर घेण्याची सुवर्णसंधी आहे.

















