एक्स्प्लोर
NCP Conclave: राष्ट्रवादीत निधी वाटपावरून धुसफूस, अजित पवारांकडे तक्रारी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मुंबईतील वरळी डोम येथे आयोजित पाच दिवसीय मॅरेथॉन बैठकीत पहिल्याच दिवशी निधी वाटपावरून नाराजीनाट्य समोर आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी निधी वाटपावरून थेट तक्रार केली. 'मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे त्यांनी तक्रार केली.' या बैठकीच्या पहिल्या दिवशी नांदेड, परभणी, बीड, जालना, संभाजीनगर, हिंगोली आणि लातूर या मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या समस्या आणि संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाली. मात्र, निधी वाटपातील कथित असमानतेमुळे स्थानिक नेत्यांमध्ये असलेली खदखद या बैठकीदरम्यान उघड झाली.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















