Maharashtra Live blog: 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर, 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra Live blog: पोलिस कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या रोहित आर्या (Rohit Arya) प्रकरणात महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने चौकशीचे निर्देश दिले आहेत. आयोगाने या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या तपासासाठी पोलिस महानिरीक्षक विश्वास पांढरे व आयोगाचे निबंधक, न्यायाधीश विजय केदार यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी सर्व पुरावे गोळा करून सविस्तर अहवाल सादर करावा. तसेच या प्रकरणाची चौकशी करताना सरकारने आवश्यक ती माहिती व पुरावे या तपास पथकाला द्यावेत, असेही आयोगाने म्हटले आहे.
मुंबईच्या पोलिस आयुक्तांना व न्यायदंडाधिकाऱ्यांना या प्रकरणी आठ आठवबंधांत अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाचे अध्यक्ष निवृत न्यायमूर्ती ए. एम. बदर यांनी दिले. पुढील सुनावणी आयोगाचे अध्यक्ष बदर व सदस्य संजयकुमार यांच्या खंडपीठासमोर ८ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.
गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबईचे पोलिस आयुक्त, मुंबईचे न्यायदंडाधिकारी यांना या प्रकरणातील सर्व संबंधित कागदपत्रे आठ आठवळ्यांत सादर करण्याचे निर्देशही आयोगाने दिले आहेत. पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यूचे अंतिम कारण प्रमाणपत्र, बैलिस्टिक अहवाल आणि दंडाधिकारी चौकशीचा अहवाल यांचा यात समावेश आहे. पोलिस आयुक्तांना मृतकाची पत्नी अंजली आर्या यांना या कार्यवाहीची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणाशी संबंधित इतर कोणतीही न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्यास ती आयुक्तांनी आयोगास कळवावी, असेही आयोगाने नमूद केले आहे.
निलम गोर्हेंकडून महिलांच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा उल्लेख
- निलम गोर्हेंकडून महिलांच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा उल्लेख
- मी दरवर्षी १ पुस्तक लिहिले, महिला धोरण, स्त्री सशक्तीकरण यावर आधारीत
- दारू विरोधात महिलानी आंदोलन केली त्या ३२ हजार महिलांवरील गुन्हे मागे घेण्यात आले शिवशाही सरकारमध्ये
- दाही दिशा म्हणजे दहा दिशांनी येणारी संकटांचा सामना करण्यासाठी शक्ती दे
- महिलाना येणार्या अडचणी यावर मी मुंबई सकाळमध्ये सदर लिहित होते
- तो सर्व कालावधी, लेख यावर आधारीत हे पुस्तक आहे
- टक्केवारी फक्त कामात नसते तर भाषणातही असते. त्यामुळे तुम्ही सविस्त बोला
- सामंतावर मी जबाबदारी सोपवली होती. तुम्ही साहेबांना सोबत आणायचं आणि वेळेत तुम्हीही यायचं
246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर
राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी आजपासून, 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
























