एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | ठाण्याची बाजारपेठ आजपासून तीन दिवस बंद राहणार
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ठाणे बाजारपेठ शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे : कोरोनासारख्या घातक व्हायरसचा चोख बंदोबस्त करण्यासाठी राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था यांच्यासह समस्त ठाणेकरांनी कशोशीने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यात त्यांना यश आले आहे. कोरोनाचे आव्हान आता ठाण्यातील पोलीस, व्यापारी आणि महानगरपालिकेच्या वतीने स्वीकारले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ठाणे बाजारपेठ शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय समन्वय बैठकीत गुरुवारी (19 मार्च) घेण्यात आला आहे. ठाण्यात कोरोनाच्या फैलावला अटकाव करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन, महानगरपालिका, सामाजिक संस्था आणि त्या पाठोपाठ ठाण्यातील मुख्य बाजारपेठच्या व्यपाऱ्यांनीही सहभाग दर्शवला आहे.
गर्दीच्या ठिकाणी याच कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. शासकीय कार्यालये आणि खाजगी कंपन्यांनी गर्दी टाळण्यासाठी अनेक उपाययोजना करत कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करा ही भूमिका स्वीकारल्याने ठाणेकर सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करत आहेत. सद्यस्थितीत ठाणे कोरोनाच्या वक्रदृष्टीपासून सुरक्षित आहे. म्हणूनच गर्दी टाळण्यासाठी ठाण्यातील व्यापारी वर्ग पुढे आला आहे. ठाणे महापालिका सहआयुक्त मारुती गायकवाड, परिमंडळ एकच्या सहाय्यक पोलीस आयुक्त एन ए पडवी, ठाणेनगर पोलीस स्थानकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी गुरुवारी हजर होते. या समन्वय बैठकीत गर्दी टाळण्यासाठी तीन दिवस ठाण्यातील मुख्य बाजारपेठ बंद ठेवून कोरोनाला हद्दपार ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद राहतील केवळ औषधी दुकाने याला अपवाद ठरणार आहे.
पोलीस, पालिका आणि व्यापारी यांच्या समन्वय बैठकीनंतर मात्र ठामपा सहाय्यक पालिका आयुक्त मारुती गायकवाड , ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी आणि व्यापारी मंडळाचे प्रतिनिधी यांनी गुरुवारी बाजारपेठेत कोरोनाचा धोका, गर्दीचा धोका याबाबत जनजागृती करुन सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला सर्व व्यापाऱ्यांनी सहमती दर्शवल्याने शुक्रवार (20 मार्च), शनिवार (21 मार्च) आणि रविवारी (22 मार्च) या तीनदिवसात सर्व दुकाने बंद राहणार आहे. याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त एन ए पडवी यांनी सांगितले की, "कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यात उपाययोजना आणि जनजागृतीमुळे ठाणे सुरक्षित असले तरीही बाजारात होणाऱ्या गर्दीने मात्र कोरोना ठाण्यात बस्तान मांडू शकतो. म्हणूनच तीन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याच्या निर्णयाला ठाणेकरांनी सहकार्य करुन सर्व परिसरात गर्दी टाळावी."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
राजकारण
राजकारण
Advertisement