Coronavirus | मास्कबाबत जनजागृतीसाठी मुंबई पोलिसांची नामी शक्कल; शाहरूख खानच्या चित्रपटाचा सीन शेअर
देशातील सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. तर महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात सर्वाधिक कोरोना बाधित आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लोकांनी लॉकडाऊनचं पालन करावं म्हणून प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी अनेक उपाय केले जात आहेत. सध्या जागरूकता आणि संदेश पसरवण्यासाठी मुंबई पोलिसांनी अनेक हटके पर्यायांचा वापर केला आहे. सोशल मीडियाचा आधार घेत मुंबई पोलीस आगळ्या वेगळ्या पद्धतीने लोकांमध्ये जनजागृती करत आहेत. मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँन्डलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून नेटकऱ्यांना हे गाणं प्रचंड आवडलं आहे.
मुंबई पोलिसांनी मास्कचा वापर करणं कितपत आवश्यक आहे, हे पटवून देण्यासाठी ट्विटरवर शाहरूख खानचा चित्रपटातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना 'मास्क आहे ना' हे कॅप्शन देत लिहिलं आहे. 'हा क्लास धडा शिकवण्यासाठी आहे.'
सोशल मीडियावर मुंबई पोलीसांचं ट्वीट व्हायरल झाल्यानंतर युजर्स लाईक्सचा वर्षाव देत आहेत. एका युजर्स पोलिसांनी पसरवलेल्या जागरूकतेबाबत धन्यवाद दिलं आहे.
आणखी एका व्यक्तीने मास्कचा वापर करण्यासाठी केलेल्या जागरूकतेबाबत पोलिसांचं कौतुक केलं आहे. तर कोणी शायरीमार्फत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भारतात कोरोना व्हायरसचे रूग्ण सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत. येथे संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या 1985 आहे. तर मृत्यू झालेल्यांची संख्या 149 आहे. यासाठी मुंबई पोलीस सोशल मीडियामार्फत जनजागृती करत आहेत.
संबंधित बातम्या :
Coronavirus | व्हॉट्सअॅप मेसेज फॉरवर्ड करताय, आधी महाराष्ट्र सायबरची मार्गदर्शिका वाचा!
लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाही; गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा