एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona | कोरोनाचा गैरफायदा घेत बोगस सॅनिटायझरची विक्री, मुंबईतून लाखोचं बनावट सॅनिटायझर जप्त
एफडीएनं ही धाड टाकलेली असतांना दुसरीकडे बाजारात सर्रास ही बोगस सॅनिटायझर विकली जात आहेत. प्रमाणित कंपन्यांचे पर्याय उपलब्ध नसल्यानं ग्राहकांच्या गळ्यात हीच बोगस सॅनिटायझर मारली जात आहेत.
मुंबई : कोरोना होऊ नये म्हणून परवडत नसलं तरी अनेक जण सॅनिटायझरनं हात स्वच्छ करण्याचा प्राधान्य देत आहेत. मात्र पैसे मोजूनही तुमच्या हातात बनावट सॅनिटायझर तर थोपवलं जात नाही ना? कारण मुंबईतून लाखोंचं बनावट सॅनिटायझर जप्त करण्यात आलं आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं ही कारवाई केली आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी अनेकांची गाळण उडाली आहे. पण, अनेकजण या भीतीच्या लाटेतही आपले हात घुवून घेत असल्याचे समोर आले आहे. बाजारात प्रमाणित कंपन्यांच्या सॅनिटायझरचा, हॅन्ड वॉशचा तुटवडा आहे. त्याची जागा आता बोगस सॅनिटायझर आणि बोगस हॅन्ड वॉशनं घेतली आहे. गेल्या अवघ्या 8 दिवसांतच मुंबईत मेड इन वाकोला आणि मेड इन चारकोप अशी सॅनिटायझरची नवनवे अवैध उत्पादनं जन्माला आली आहेत. यांपैकी संस्कार आयुर्वेद हॅन्ड सॅनिटायझर अशा संस्कारी नावानं सुरु असलेला बोगस सॅनिटायझरचा आणि बोगस हॅन्ड वॉशचा काळा धंदा उघड झाला आहे.
#CoronaVirus | महाराष्ट्रातील 11 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत, अधिकची काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मेड इन वाकोला ब्रॅन्ड
चले तो चांद नहीं तो रात तक ही म्हण आली तिच मूळ मेड इन चायना असणाऱ्या वस्तुंसाठी. पण, आता चीनमधून कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आणि मेड इन चायनाचा सर्वांनीच धसका घेतला. पण, मेड इन चायनालाही टक्कर देतील असे ब्रॅन्ड रातोरात मुंबईच्या गल्लोगल्ली आता तयार झाले आहेत. संस्कार आयुर्वेद या अतिशय संस्कारी नावानं मेड इन वाकोला ब्रॅन्डचं बोगस सॅनिटायझर सध्या बाजारात आलं आहे. वाकोल्यातील एका गल्लीत संस्कार आयुर्वेद नावाच्या एक छोटेखानी कंपनीत हे बोगस सॅनिटायझर बनवलं जातं होतं. मोठ्या ड्रममध्ये निकृष्ठ दर्जाचा कच्चा माल वापरुन हे सॅनिटायझर 100 ते 150 मिली प्रमाणात बाटल्यांमध्ये भरलं जातं होतं. एबीपी माझाची टीम ज्यावेळी या कंपनीत पोहोचली तेव्हा एफडीएनं या कंपनीवर धाड टाकून जवळपास 1 लाख किंमतीचा माल जप्त केला आहे.
#CoronaVirus | सॅनिटायझरचा तुटवडा, मुंबईत गेल्या पंधरा दिवसांत आठपट मागणी वाढली
8 दिवसांतच नव्यानं जन्मली कंपनी
ही बोगस सॅनिटायझर आणि हॅन्डवॉश तयार करणारी कंपनी गेल्या 8 दिवसांतच नव्यानं जन्माला आली आहे. हॅन्ड वॉश किंवा सॅनिटायझर तयर करणाऱ्या कंपन्यांना एफडीएचा परवाना असणं आवश्यक आहे. शिवाय, उत्पादनावर रजिस्ट्रेशन नंबर, लायसन्स नंबर, बॅच नंबर ही माहिती असणंही गरजेचं आहे. मात्र, 105 ते 190 रुपयांना विकली जाणाऱ्या या बाटलीत निव्वळ पाणी आणि निकृष्ट दर्जाच्या कच्च्या मालाचं मिश्रण आहे.
#CoronaVirus | कोरोनाचा धसका, तुकाराम बीजेवर सावट, प्रसिद्ध येरमाळासह राज्यातील अनेक यात्रा, कार्यक्रम रद्द
एकीकडे एफडीएनं ही धाड टाकलेली असतांना दुसरीकडे बाजारात सर्रास ही बोगस सॅनिटायझर विकली जात आहेत. प्रमाणित कंपन्यांचे पर्याय उपलब्ध नसल्यानं ग्राहकांच्या गळ्यात हीच बोगस सॅनिटायझर मारली जात आहेत.
Coronavirus | जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement