Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं?
भारताची प्रमुख देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी 21 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
Sanju Samson Dropped From Kerala Squad : भारताची प्रमुख देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी 21 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी संघांची घोषणा केल्या जात आहे. केरळनेही मंगळवारी (17 डिसेंबर) आपला संघ जाहीर केला आहे, पण त्यात प्रमुख खेळाडू संजू सॅमसनच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. तेव्हापासून संजूला संघात का स्थान मिळाले नाही, अशी चर्चा सुरू होती, मात्र आता त्यामागचे मोठे कारण समोर आले आहे.
संजू अलीकडेच संघाच्या शिबिरात सामील झाला नव्हता आणि त्यामुळेच त्याला संघातून वगळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या नावाचा संभाव्य संघात समावेश करण्यात आला होता, मात्र अंतिम संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.
शिबिरात सहभागी न झाल्यामुळे संजू सॅमसनचा पत्ता कट
अलीकडेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत केरळचे कर्णधारपद भूषवणाऱ्या संजू सॅमसनला विजय हजारे ट्रॉफीच्या संघातून वगळण्यात आले आहे. तयारी शिबिरात संघ सहभागी न होणे हे त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. केरळने गेल्या आठवड्यात या स्पर्धेसाठी 30 सदस्यीय संभाव्य संघाची घोषणा केली होती आणि त्यानंतर तीन दिवसांनी तयारीसाठी शिबिर आयोजित केले होते. केरळने वायनाडच्या कृष्णगिरी स्टेडियमवर दोन सराव सामने खेळले, त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी 19 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. सॅमसन या दोन्ही सामन्यांमध्ये सहभागी झाला नव्हता. याच कारणामुळे त्याच्या नावाचा निवडीसाठी विचार करण्यात आला नाही.
केसीएचे सचिव विनोद एस कुमार यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, संजूने कॅम्पसाठी उपलब्ध नसल्याचा ईमेल पाठवला होता. संघाने त्याच्याशिवाय वायनाडमध्ये एक छोटासा कॅम्प लावला. साहजिकच, आम्ही निवडीसाठी केवळ सत्राचा भाग असलेल्यांचा विचार केला. या विषयावर त्याच्याशी पुढे कोणतीही चर्चा झालेली नाही.
विजय हजारे ट्रॉफी 2024 साठी केरळच्या संघात : सलमान निझार (कर्णधार), रोहन एस कुनुमल, शॉन रॉजर, मोहम्मद अझरुद्दीन एम (यष्टीरक्षक), आनंद कृष्णन, कृष्ण प्रसाद, अहमद इम्रान, जलज सक्सेना, आदित्य सरवते, सिजोमन जोसेफ, बेसिल एन थाम्प, बेसिल एन पी. निधीश एमडी, एडन ऍपल टॉम, शराफुद्दीन एनएम, अखिल स्करिया, विश्वेश्वर सुरेश, वैशाख चंद्रन, अजनास एम (यष्टीरक्षक)
हे ही वाचा-