एक्स्प्लोर

Corona Effect | संचारबंदीच्या काळात शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अध्यापन प्रक्रिया

संचारबंदीच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सर्व तंत्रशिक्षण संस्थांमधील कामकाज 'वर्क फ्रॉम होम' या ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शिकवणीसाठी ऑनलाईन अध्यापन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असताना आणि दुसरीकडे विविध अभ्यासक्रम अपूर्ण असल्याने महाविद्यालयातील प्राध्यापकांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शिकवणीसाठी ऑनलाईन अध्यापन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असं आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.

एकीकडे कोरोनामुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने या संचारबंदीच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याकरिता सर्व तंत्रशिक्षण संस्थांमधील कामकाज 'वर्क फ्रॉम होम' या ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात येत आहे. हे ऑनलाईन कामकाज पूर्ण करण्यासंदर्भात तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ हे व्हॉट्सअॅप ग्रुपवर मार्गदर्शन करत आहेत.

प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अभ्यासक्रमांच्या अनुषंगाने माहिती पुरवणे तसेच पाठ्यक्रमानुसार व्हिडिओ तयार करून ते इमेल, व्हॉट्सअॅपद्वारे उपलब्ध करून देणे. तसेच ऑनलाईन संसाधनांचा (SWAYAM, NEAT, COURSERA, edX etc) अध्ययनासाठी स्वतः प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी वापर करणे , Screen-o-matic सारख्या ऑनलाईन व्हिडीओ एडिटिंग प्रणालीचा वापर करून प्राध्यापकांनी विषय निहाय व्हिडीओ क्लिप तयार करून विद्यार्थ्यांना पुरवणे, व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे नेमवून दिलेले कार्य (Assignment) पूर्ण करून घेणे, विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, पुढील सत्राचे शैक्षणिक नियोजन विभागास सादर करणे, प्रश्नावलीची बँक तयार करणे, असे अनेक ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जास्तीत जास्त ऑनलाईन वापर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, असे आवाहनही उदय सामंत यांनी केले आहे.

पुढील टप्प्यात सर्व संस्थांचा आढावा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाने नियोजन केले आहे. सर्व संस्था व प्राध्यापक यांना गुगल फॉर्म पाठवून त्यांनी वर्क फ्रॉम होम करताना वरीलपैकी कोणकोणते पर्याय वापरले, त्याचा किती विद्यार्थ्यांना फायदा झाला? तपासण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक आणि संबंधित संस्थेचे प्राचार्य यांना जबाबदारी देण्यात आली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतनांमधील प्राध्यापक पदांना सातवा वेतन आयोग लागू करताना शासनाने प्राध्यापकांची कामगिरी तपासण्यासाठी 360 डिग्री फीडबॅक संकल्पना अनिवार्य केली आहे. यात प्राध्यापक वर्गाचे वार्षिक गोपनीय अहवाल, आणि '360 डिग्री फीडबॅक' या बाबींचे मूल्यमापन करताना त्यांनी 'वर्क फ्रॉम होम' अंतर्गत केलेल्या कार्याचा मूल्यमापनाच्या दृष्टीने समावेश असेल, अशा पद्धतीने आधुनिक तंत्रावर आधारित अध्यापन पद्धतींचा वापर करून या लॉकडाऊन कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget