एक्स्प्लोर

Congress President | काँग्रेस अध्यक्षपदासाठी तीन नावं चर्चेत, सुशीलकुमार शिंदे आघाडीवर?

काँग्रेस कार्यकारिणीच्या आज होणाऱ्या बैठकीआधी अध्यक्षपदी कोण अशी चर्चा रंगली आहे. अध्यक्षपदासाठी सध्या तीन नावं चर्चेत असून सुशीलकुमार शिंदे आघाडीवर आहेत.

मुंबई : काँग्रेस कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक होत आहे. त्याआधीच काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंब बाहेरील व्यक्ती अध्यक्ष होऊ शकतो ही चर्चा सुरु झाली आहे. राहुल गांधी नेतृत्व स्वीकारण्यास तयार नसल्यामुळे गांधी कुटुंबाच्या विश्वासू व्यक्तीकडे नेतृत्व देणार असल्याचं सांगितलं जात आहे. यात सुशील कुमार शिंदे, मीरा कुमार आणि अशोक गेहलोत यांची नावं शर्यतीत असल्याचं समजतं. अशोक गेहलोत राज्य सोडण्यास अनुत्सुक असल्याने काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशील कुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीतील एका गटाकडून सुशील कुमार शिंदे यांच्या नावाचे संकेत मिळत आहे. पण सुशीलकुमार शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी यात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चा सुरु झाली होती. यानंतर सोनिया गांधी यांच्याकडेच काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद देण्यात आलं. परंतु त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे आता काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असल्याची समोर आलं. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशा नावं  चर्चेत आहेत जी गांधी कुटुंबाच्या विश्वासातील आहेत आणि काँग्रेसच्या विचारांची आहेत. यामध्ये सुशीलकुमार शिंदे, मीरा कुमार आणि अशोक गेहलोत ही तीन नावं पुढे आली आहेत.

अशोक गेहलोत राज्य सोडून दिल्लीत जाण्यास तयार नसल्याने सुशीलकुमार शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीआधी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा रंगते. आता एका गटाकडून सुशीलकुमार शिंदे यांचं नाव पुढे आलं आहे. परंतु शिंदेंच्या निकटवर्तीयांकडून यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आजच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत कोणता निर्णय होणार? अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर होणार का? गांधी कुटुंबातील की गांधी कुटुंबाखेरीज व्यक्ती काँग्रेस अध्यक्ष होणार हे पाहणं उत्सुकचे असेल.

Congress President : काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशील कुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget