एक्स्प्लोर
काँग्रेस मनसेशी कधीच युती करणार नाही : संजय निरुपम
‘काँग्रेस मनसेशी कधीच युती करणार नाही.’ असं वक्तव्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं आहे.
मुंबई : ‘काँग्रेस मनसेशी कधीच युती करणार नाही.’ असं वक्तव्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं आहे. मुंबईत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेची युती होणार ही फक्त अफवा आहे. या चर्चेचे मी खंडन करतो.भविष्यात आमची कोणतीही युती होणार नाही.कारण काँग्रेस नेहमी समविचारी पक्षाशी युती करते आणि मनसे हा कोणताही विचार नसलेला पक्ष आहे.’ असं म्हणत निरुपम यांनी मनसेवर निशाणा साधला.
‘मनसे फक्त समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आला आहे. त्यामुळे अशा पक्षाशी काँग्रेस कधीच युती करणार नाही.’ असंही संजय निरुपम यावेळी म्हणाले.
‘मनसेने याआधी उत्तर भारतीयांना मारझोड केली. आत्ता गुजराती समाजाला मनसे त्रास देत आहे. दोन दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कांदिवली येथे दुकानांवरील पाट्यांची तोडफोड केली. मनसेचा हा मार्ग चुकीचा आहे. मुंबईतील सर्व वर्गांना सरंक्षण मिळाले पाहिजे आणि ही सरकारची जबाबदारी आहे. अशी मागणीही निरुपम यांनी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
पुणे
बीड
Advertisement