एक्स्प्लोर
'मुंबईला खड्ड्यात घालणाऱ्यांना खड्ड्यात पुरण्याची वेळ'
मुंबई : गेली 25 वर्ष मुंबईकरांना खड्ड्यात घालणाऱ्या सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने मुंबईकरांच्या जीवाशी खेळ केला आहे. त्यामुळे त्यांना पालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवत खड्ड्यात पुरण्याची वेळ आली आहे, असा निशाणा काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी साधला आहे.
'मुंबईत खड्डे की खड्ड्यांची मुंबई' या खड्ड्यांच्या फोटोचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. गेल्या दोन आठवड्यात पडलेल्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची चाळण झाली आहे. मुंबईत ठिकठिकाणी रस्त्यात पडलेल्या हजारो खड्ड्यातून मार्ग काढताना मुंबईकरांचा जीव कंठाशी आला आहे, मात्र मुंबईत अवघे 66 खड्डे असल्याचा दावा पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने केल्यामुळे फोटोंच्या प्रदर्शनातून आमदार नितेश राणे यांनी प्रशासनाला तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे.
मुंबईकरांनी आमदार नितेश राणे यांच्या या अभिनव उपक्रमाला प्रतिसाद देत पालिका प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारावर तोंडसुख घेतलं. सत्ताधारी शिवसेना-भाजप आणि मनसेच्या 100 पेक्षा अधिक नगरसेवकांच्या वॉर्डातील खड्ड्यांचे तब्बल 450 पेक्षा जास्त फोटो प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.
मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, माजी महापौर सुनील प्रभू, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्या वॉर्डातील रस्त्यांचे झालेले डबके ठळकपणे दाखवण्यात आले आहेत. भ्रष्ट सत्ताधाऱ्यांनी अवघे 66 खड्डे असल्याचा दावा केला असला तरी अवघ्या पाच तासांत आमच्या कार्यकर्त्यांना हजारो खड्डे सापडले. याचा अर्थ मुंबईत जागोजागी किती खड्डे असतील, याची कल्पना न केलेलीच बरी, असंही नितेश राणे म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement