एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईच्या त्रिभाजनावरुन विधानसभेत रणकंदन
मुंबईच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव यायला निमित्त ठरली भानू फरसाणला लागलेली आग, ज्यात 12 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.
मुंबई : साकीनाक्याजवळ ज्या भानू फरसाणला आग लागली ते अनधिकृत असल्याचं समोर आलं. इतकंच नव्हे तर पोलिसांनी त्याच्या मालकाला बेड्याही ठोकल्यात. याच घटनेचा आधार घेऊन विधानसभेत काँग्रेस आमदार नसीम खान यांनी लोकांच्या सोईसाठी मुंबई महापालिकेच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव मांडला. त्यावर शिवसेना-भाजपने नसीम खान यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्या. ज्या कामकाजातून वगळ्यात आल्या.
नसीम खान यांनी मुंबईच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव मांडला आणि विधानसभेत भूकंप झाला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलारांनी हा मुंबई तोडण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त करत आक्षेप नोंदवला.
मुंबईच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव का आला?
मुंबईच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव यायला निमित्त ठरली भानू फरसाणला लागलेली आग, ज्यात 12 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.
2014 च्या अंदाजित आकडेवारीनुसार मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 26 लाख आहे. तर लोकसंख्या घनतेत मुंबई पहिल्या नंबरवर. म्हणजे प्रति स्क्वेअर किलोमीटरला 31 हजार 700 इतकी घनता. त्यात मलबार हिल, फोर्टपासून मुलुंडपर्यंत आणि इकडे दहीसरपर्यंत मुंबई अक्राळविक्राळ पसरलीय. त्यामुळे सोईसुविधा आणि त्यांची देखभाल करताना महापालिकेची दमछाक होते.
मुंबईत दरदिवशी घडणाऱ्या दुर्घटना आणखी गंभीर आहेत.
मुंबईत महिन्याभरात निव्वळ आगीच्या सरासरी 400 ते 450 घटना घडतात. म्हणजे दिवसाला मुंबईत किमान 15 आगी लागतात, त्याचं स्वरुप लहानमोठं असू शकतं. आग वगळता झाड पडणे, समुद्रात बुडण्याच्या किमान 35 घटना रोज घडतात.
विभागवार विचार केला तर दक्षिण मुंबईत सर्वात जास्त घनतेचा भाग आहे. इथे प्रति चौरस किलोमीटर 45 हजार लोक वावरतात, तर पश्चिम उपनगरात हीच घनता 26 हजार आणि पूर्व उपनगरात 24 हजार इतकी आहे. त्यामुळे त्रिभाजन झालं तर देखभाल, दुरुस्ती आणि सोईसुविधांची उपलब्धता करणं सोपं होऊ शकतं.
मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही या प्रस्तावावर विचार करावा लागेल, असं म्हटलं आहे. ''ज्यांनी हा प्रस्ताव आणला त्याचा त्यांना अधिकार आहे. मात्र प्रस्ताव आणला की लगेच तो लागू करता येत नाही. त्यावर विचार करावा लागेल. साकीनाका दुर्घटनेतील संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल'', असं महापौर म्हणाले.
मुंबईत उभं राहायला जागा नाही, चालायला फूटपाथ नाही, प्रवासात बसता येत नाही. पार्किंगला लॉट नाही. तिथे लोकांना मोकळा श्वास घेता येईल याची व्यवस्था करणं काय चूक आहे? एका महापालिकेच्या तीन महापालिका केल्याने मुंबई महाराष्ट्रापासून कशी तुटेल? भावनिक मुद्दे पुढे करुन मुंबईचा गळा घोटणार का? हा प्रश्न आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement