एक्स्प्लोर

कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या भवितव्याचा फैसला 22 जूनला

मालेगावमध्ये 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या भवितव्याचा फैसला 22 जूनला होणार आहे.

मुंबई : मालेगावमध्ये 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या भवितव्याचा फैसला 22 जूनला होणार आहे. कर्नल पुरोहितांनी या खटल्यातून आपल्याला आरोपमुक्त करण्यात यावं यासाठी याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर 22 जूनला मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम फैसला येण्याची शक्यता आहे. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आपल्यावर आरोप ठेवण्यापूर्वी लष्कराची परवानगी घेण्यात आली नसल्यानं आपल्या विरोधात खटलाच दाखल करता येत नाही असं म्हणत यातून आपल्याला आरोप मुक्त करण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात केली आहे. पुरोहित यांच्या या याचिकेला एनआयएनं मात्र आक्षेप विरोध केला आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने पुरोहित यांना एनआयए कोर्टात जाण्याचे निर्देश दिले असल्यानं हायकोर्टात त्यांनी असा अर्ज करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. यावरच आता 22 जूनला न्यायमूर्ती आर. एम. मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठापुढे पुन्हा सुनावणी होणार आहे. कर्नल पुरोहित यांच्यावरील मोक्का अंतर्गत असलेले आरोप हटवण्यात आले असून त्यांच्यावर युएपीए अंतर्गत मात्र आरोप कायम ठेवण्यात आलेले आहेत. कोण आहेत कर्नल प्रसाद पुरोहित? लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित... 2008 च्या मालेगाव स्फोटानंतर देशभरातलं सर्वात चर्चेत असलेलं नाव.. एटीएसने पुरोहितांना अटक केल्यानंतर तब्बल 9 वर्ष त्यांनी जेलमध्ये घालवली आणि अखेर सुप्रीम कोर्टाने 21 ऑगस्ट 2017 रोजी त्यांना जामीन मंजूर केला. मालेगाव स्फोटात 7 जणांचा जीव गेला होता. तर 80 हून अधिक लोक जखमी झाले होते. यानंतर हिंदुत्ववादी संघटना एटीएसच्या रडारवर आल्या. त्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, कर्नल श्रीकांत पुरोहितांसह 10 जणांना अटक करण्यात आली. केंद्रीय गृहखात्याने 2011 च्या सुरुवातीला तपास एनआयएकडे सोपवला. 4 हजार पानी आरोपपत्र दाखल झालं. पण 9 वर्षात एकाही आरोपाची निश्चिती झाली नाही. याआधी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांचा जामीन हायकोर्टानेही फेटाळला होता. त्याला पुरोहितांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. एनआयएला 9 वर्ष केस तडीस लावण्यात यश आलं नाही. शिवाय आमच्याकडे ठोस पुरावे आहेत, याशिवाय मोठा युक्तीवादही करणं शक्य झालं नाही. याउलट पुरोहितांची बाजू देशातले नामांकित वकील हरीश साळवेंनी मांडली.  आरोपपत्रात एनआयएने विसंतगत आणि परस्परविरोधी माहिती दिल्याचं साळवेंनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
R Ashwin : आर. अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Nagpur : दोन दिवसांनंतर अजित पवार आज सभागृहात जाणारAmol Mitkari Nagpur : अजित पवार आणि शशिकांत शिंदेंच्या भेटीवर अमोल मिटकरी काय म्हणाले?Suresh Dhas Meet Ajit Pawar:त्या 6-7 जणांचा आका कोण आहे? त्या आकांचा आका कोण?धस यांचा निशाणा कुणावर?MVA Government : मविआ काळात फडणवीस, शिंदेंना अटक करण्याच्या कटाचा तपास SIT मार्फत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
R Ashwin : आर. अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
Astrology : यंदाची संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांचा पुत्र मुख्य प्रतोद, प्रदेशाध्यक्ष पदासाठी 5 जण शर्यतीत
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांच्या मुलाला मोठी जबाबदारी, प्रदेशाध्यक्षपदी कोण?
Embed widget