एक्स्प्लोर
Advertisement
सवंग लोकप्रियतेसाठी संजय निरुपम यांचे आरोप : मुख्यमंत्री कार्यालय
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळाने 3 मार्च 2014 रोजी या जागेला मान्यता दिली. यात कारडेपो आरे येथेच राहिल, याचा निर्णयही घेतला होता. या जागेचा ताबा ऑगस्ट 2014 मध्ये देण्यात आला, त्यावेळी फडणवीस सरकार सत्तेत नव्हते.
मुंबई : आरे कॉलनीत मुंबई मेट्रोचं कारशेड करताना मुख्यमंत्र्यांनी घोटाळा केल्याच्या संजय निरुपम यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. मेट्रो कारशेडच्या जागेसंदर्भात संजय निरुपम यांचा आरोप धादांत खोटा आणि मुख्यमंत्र्यांची बदनामी करणारा आहे. वस्तुस्थिती समजून न घेता केवळ सवंग लोकप्रियतेसाठी हे आरोप केल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं आहे.
संजय निरुपम यांचा आरोप
मुंबई मेट्रोचं कारशेड आरे कॉलनीत करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 हजार कोटींचा घोटाळा केला, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मेट्रोच्या कारशेडसाठी फक्त 12 हेक्टर जागा लागते. मात्र मुख्यमंत्र्यांनी 30 हेक्टर जागेला मंजुरी दिली. 18 हेक्टर जमीन मेट्रोला आणि उरलेली 12 हेक्टर जमीन विकासकाला देण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मात्र या आरोपांवर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री कार्यालयाने या संदर्भातील वस्तुस्थिती काय आहे याची माहिती दिली.
- आरे कारशेडच्या जागेवर कुठलाही व्यावसायिक वापर प्रस्तावित नाही. संपूर्ण 30 हेक्टर जागा ही मेट्रो कारशेडसाठी वापरली जाणार आहे.
या 30 हेक्टर जागेत 5 हेक्टर हा ग्रीनपॅच आहे. त्याला कुठलीही बाधा न येता तो तसाच ग्रीनपॅच राहणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कारडेपोसाठी वापरण्यात येणारी जागा ही 25 हेक्टर इतकीच आहे, असं मुख्यमंत्र्यांच्या वतीने सांगण्यात आलं.
आरे मेट्रो कारशेडमध्ये मुख्यमंत्र्यांनी 18 हजार कोटींचा घोटाळा केला : निरुपम
- संजय निरुपम यांच्या आरोपानुसार यातील कोणतीही जागा वनविभागाची नाही, तर ती दुग्धविकास विभागाची आहे. वनविभागाने राष्ट्रीय हरित लवादाकडे एक प्रतिज्ञापत्र सादर करुन ही आमची जागा नाही, असं स्पष्ट केलं आहे.
- तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळाने 3 मार्च 2014 रोजी या जागेला मान्यता दिली. यात कारडेपो आरे येथेच राहिल, याचा निर्णयही घेतला होता. या जागेचा ताबा ऑगस्ट 2014 मध्ये देण्यात आला, त्यावेळी फडणवीस सरकार सत्तेत नव्हते.
- या 30 हेक्टर जागेचा वापर पुढीलप्रमाणे आहे : डेपो परिसर : 21 हेक्टर, अप्रोच लाईन्स आणि डेपो स्टेशनसाठी 4 हेक्टर, ग्रीनपॅच 5 हेक्टर (एकूण 30 हेक्टर). यापैकी एकही इंच जागेचा कुठल्याही प्रकारे व्यावसायिक वापर होणार नसल्याने एफएसआय वगैरे आरोप हे निव्वळ हास्यास्पद आहेत.
- मुंबई मेट्रो 3 हा 33.5 कि.मीचा मार्ग आहे. त्यावर सुरुवातीच्या काळात 8 डब्याच्या 35 आणि नंतरच्या काळात 8 डब्याच्या 55 मेट्रो धावणार असल्याने या 30 हेक्टर जागेची आवश्यकता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement