एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, शिंदे गट आणि मनसेची वाढती जवळीक, राजकीय चर्चांना उधाण

Marashtra Politics News : मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, शिंदे गट आणि मनसेची वाढती जवळीक, राजकीय चर्चांना उधाण

Marashtra Politics News : शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. यादरम्यान, राज्याच्या राजकारणात अनेक खळबळजनक गोष्टी घडताना दिसल्या. तसेच, अनेक नवी समीकरणं जुळल्याचं पाहायला मिळालं. अशाच एका समीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. ती म्हणजे, भाजप (BJP), शिंदे गट आणि मनसेच्या (MNS) युतीची. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते, शिंदे गटातील (Shinde Group) नेते यांच्या आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीगाठी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. 

मनसे आणि शिंदे गटाच्या वाढत्या जवळीकीमुळे हे दोन्ही पक्ष आणि भाजपची महायुती होणार का? याची चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा सुरु असतानाच आज मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. ही भेट दिवाळीनिमित्त होती की, त्यात राजकीय चर्चा झाली याबाबत माहिती मिळालेली नाही. पण शिंदे गट आणि मनसेची वाढती जवळीक त्यामुळे आणखी अधोरेखित झाली आहे.  

पक्षाविरोधात बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यापूर्वी आणि त्यानंतरही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या विसास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. याव्यतिरिक्त अनेक शिंदे गटातील नेते आणि भाजप नेत्यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच भाजप, शिंदे गट आणि मनसेची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरत होती. अशातच आता मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच, भाजप, शिंदे गट आणि मनसेच्या महायुतीच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP MajhaGavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget