एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मंत्रालयात आंबेडकरांचे तैलचित्र लावायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही का? : मुंडे
मंत्रालयाच्या इमारतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही का? असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई : मंत्रालयाच्या इमारतीमध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावण्यासंदर्भात वर्षभरापूर्वी प्रशासन स्तरावरील कार्यवाही पूर्ण करण्यात आली. परंतु अद्याप हा प्रस्ताव प्रलंबित पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यासाठी वेळ नाही का? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
आज संविधान दिनानिमित्त विधानपरिषदेत सभापतींनी मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना धनंजय मुंडे यांनी हा महत्वाचा विषय उपस्थित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्रासह संविधानाचे प्रास्ताविकदेखील मंत्रालयाच्या इमारतीत लावण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, असेही मुंडे यांनी सांगितले.
मुंडे म्हणाले की, ज्या इमारतीतून राज्याचा कारभार पाहिला जातो, त्या शासकीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि संविधानाचे तैलचित्र लावल्यास त्यांचा उचित सन्मान होणार आहे. परंतु यासाठी मुख्यमंत्री वेळ देऊ शकत नाहीत. संविधान दिनाचे औचित्य साधून आजच डॉ. बाबासाहेबांचे व संविधानाच्या प्रास्ताविकाचे तैलचित्र मंत्रालय इमारतीत लावावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली
धनंजय मुंडेंच्या मागणीनंतर महसुल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, याबाबत संपूर्ण माहिती घेऊन कारवाई केली जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement