एक्स्प्लोर
आमचा आवाज कुणीही दाबू शकत नाही : मुख्यमंत्री
‘मी आज जास्त बोलणार नाही. माझा आवाज बसला आहे. पण माझा आवाज बसला असला तरी भाजपचा आवाज कुणीही दाबू शकत नाही. कुणाचीही ताकद नाही.’

मुंबई : विरोधकांकडून संविधान बचावचा ड्रामा सुरु असल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिरंगा रॅलीत केली.
याच वेळी भाषण करताना मुख्यमंत्र्यांचा आवाज अचानक बसला. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, ‘मी आज जास्त बोलणार नाही. माझा आवाज बसला आहे. पण माझा आवाज बसला असला तरी भाजपचा आवाज कुणीही दाबू शकत नाही. कुणाचीही ताकद नाही.’
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ‘विरोधी पक्षाची संविधान बचाव नाही तर पक्ष बचाव रॅली आहे. एकीकडे भाजपचा विस्तार होत आहे. त्यामुळे संविधानाच्या मागे लपून पार्टी वाचवण्याचं काम सुरु आहे. पण आपलं संविधान अत्यंत मजबूत आहे.’ असं ते यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र पेटवण्यासाठी कम्युनिस्टांचं कडबोळं घेऊन विरोधक काम करत असल्याचा घणाघातही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.
VIDEO :
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement


















