एक्स्प्लोर

मराठा मोर्चा म्हणजे अनेक वर्षांचा आक्रोश : मुख्यमंत्री

मुंबई : कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाजाचे विराट मोर्चे निघू लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. मराठा समाजाचे प्रश्न सर्वांनी मिळून सोडवू. त्यासाठी प्रतिमोर्चे काढण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठा मोर्चात प्रस्थापित मराठा नेत्यांना स्थान नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला आहे. त्याचसोबत शिक्षण आणि सहकार सम्राटांवरही मुख्यमंत्र्यांनी आपला निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी मराठा मोर्चा तसेच अन्य मुद्द्यांवर दूरदर्शनला मुलाखत दिली. "मराठा मोर्चा म्हणजे विस्थापितांचा प्रस्थापितांविरोधातील मोर्चा" "मराठा मोर्चा म्हणजे अनेक वर्षांचा आक्रोश आहे. बहुतांश मराठा समाजात आजही गरिबी आहे. आर्थिक मागासलेपणा आहे. त्यामुळे हा मोर्चा म्हणजे विस्थापितांचा प्रस्थापितांविरोधाती मोर्चा आहे", असे मुख्यमंत्री म्हणाले. "मराठा मोर्चांच्या प्रतिनिधींशी चर्चेस तयार" "मराठा मोर्चाच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. चर्चेतूनच प्रश्न सोडवू.", असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. "प्रतिमोर्चे काढू नये" "अॅट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्याने मराठा समाजात संताप आहे. मात्र, मराठा मोर्चा कोणत्याही जातीविरोधातील मोर्चा नाही. त्यामुळे कुणीही प्रतिमोर्चे काढू नये. मोर्चाला प्रतिमोर्चा काढणं योग्य नाही. महाराष्ट्राची सामाजिक घडी बिघडू देऊ नका.", असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीतून केलं. "प्रकाश आंबेडकरांची भूमिका योग्य" या मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी मराठा मोर्चावरुन भाजप, संघावर केलेल्या आरोपांबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, "प्रतिमोर्चा काढून संघाच्या हातचे बाहुले होऊ नये, हे प्रकाश आंबेडकरांचे राजकीय विधान आहे. पण त्यांच्या वक्तव्यातील राजकीय विधान बाजूल ठेवलं, तर त्यांनी 'प्रतिमोर्चे काढू नये', असेही म्हटलं आहे. प्रतिमोर्चा न काढण्याची प्रकाश आंबेडकरांची भूमिका योग्य आहे." "मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे" मुख्यमंत्र्यानी मराठा मोर्चांसह मराठा आरक्षणावरही आपलं मत मांडलं. ते म्हणाले, "आजच्या घडीला सर्वच समाजांमध्ये थोड्या-अधिक प्रमाणात आर्थिक मागासलेपणा आहे. मात्र, मराठा समाजातही आर्थिक मागासलेपणा आहे. त्यामुळे आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने गांभिर्याने भूमिका घेतली आहे." त्याचवेळी, आरक्षणाने सर्वच प्रश्न सुटणार नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादी, मराठा नेते आणि शिक्षण सम्राटांना टोला मराठा नेत्यांनी केवळ स्वत:ची सोय बघितली, समाजाची नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मराठा नेत्यांवर निशाणा साधला. शिवाय, या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिक्षणसम्राट आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, असेही मुलाखतीच्या समारोपादरम्यान मुख्यमंत्री म्हणाले. मराठा मोर्चा, मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्कार, मराठा नेते इत्यादी विषयांवर मुख्यमंत्र्यांनी आपली रोखठोक मतं मांडली. मुख्यमंत्र्यांच्या या मुलाखतीवर आता विरोधकांकडून कोणती प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि मराठा मोर्चाचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देतात, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाहा मुख्यमंत्र्यांची संपूर्ण मुलाखत :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
Nashik Municipal Corporation: नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
BMC Election : राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं?
राज ठाकरेंनी मुंबईत पहिला उमेदवार जाहीर करताच बंडखोरी; उद्धव ठाकरेंचा भिडू विरोधात लढण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलं?
Embed widget